अंबिका ज्वेलर्सच्या पोवाळकरला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:50+5:302021-06-16T04:33:50+5:30
कोल्हापूर : सुवर्णठेव योजनेत पैसे गुंतवण्यास भाग पाडून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेला बालींगा (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचा ...

अंबिका ज्वेलर्सच्या पोवाळकरला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी
कोल्हापूर : सुवर्णठेव योजनेत पैसे गुंतवण्यास भाग पाडून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेला बालींगा (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचा मालक सतीश ऊर्फ संदीप सखाराम पोवाळकर (वय ३४, रा. कणेरकर नगर, रिंगरोड, मूळ दोनवडे, ता. करवीर) याला मंगळवारी न्यायालयाने शुक्रवार (दि.१८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याचा साथीदार मेहुणा अमोल पोवार (वय २७ रा. सातार्डे, ता. पन्हाळा) हा अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बालींगा येथे अंबिका ज्वेलर्स नावाचे पोवाळकर याचे सराफाचे दुकान होते. त्याने सुवर्ण भिशी ठेव योजना सुरू केली. त्यामुळे बालींगा गावासह नागदेववाडी, लक्षतीर्थ वसाहत आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विश्वास संपादन करून त्याने भिशीत अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याने पैसे व दागिने असा कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पलायन केले. याबाबत १७ एप्रिल २०२१ रोजी करवीर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. प्राथमिक तपासात त्याने २ कोटी ९ लाख ४० हजार रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याची तक्रार दाखल होती. सोमवारी रात्री त्याला करवीर पोलिसांनी अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याचा मेहुणा अमोल पोवार अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फोटो नं. १५०६२०२१-कोल-सतीश पोवाळकर (आरोपी)
===Photopath===
150621\15kol_3_15062021_5.jpg
===Caption===
फोटो नं. १५०६२०२१-कोल-सतीश पोवाळकर (आरोपी)