शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सहा महिन्यांतच पडले खड्डे, खड्ड्याला पुष्पहार घालून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:18 IST

कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाचे कळे (ता.पन्हाळा) येथे पर्यंत काम होऊन सहा महिने झाले, पण अवघ्या सहा महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, पण त्याची दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतली नाही, त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याचे खरे रूप लोकांसमोर आले आहेत.कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणून कोल्हापूर ते गगनबावडाकडे पाहिले जाते. या रस्त्याचे रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षे सुरू होती. त्यातून सुरुवातील १४ मीटरचा रस्ता मंजूर झाल्याचे लोकप्रतिनिधी सांगत होते. मात्र, प्रत्येक कामाला सुरुवात झाली आणि तो १० मीटरवर आला. रस्त्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे.

अद्यापही बालिंगे पुलाशेजारी अपुऱ्या कामामुळे कसरत करतच जावे लागते. जे काम पूर्ण झाले, त्या रस्त्याच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच तक्रारी होत्या. आंदोलने झाली, निवेदने दिली, पण कोणीच त्याची दखल घेतली नाहीत. पहिल्या पावसाळ्यातच रस्त्याच्या दर्जासमोर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.

खड्ड्याला पुष्पहार घालून निषेधरस्त्याचे काम सुरू असताना अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, पण कोणीच दखल घेतली नाही. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. चिंचवडे (ता.करवीर) येथे तर एका तरुणाने खड्ड्याला पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त केला.

येथे पडलेत मोठे खड्डे..

  • चिंचवडे येथे रस्त्याच्या मध्यभागीच खड्डा पडला आहे.
  • नागदेववाडी फाटा ते बालिंगा चौकच्या दरम्यानचा रस्त्यावरील सरफेस पूर्णपणे उखडला आहे.
  • कळे ते आसगाव दरम्याच्या ओढ्याचे काम निकृष्ट झाले आहे. येथे मोठमोठे खड्डे आहेत.
  • कोपार्डे येथे रस्त्याला तडे गेले आहेत.

रस्त्याचे काम सुरू असतानाच अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांसह संबधित विभागास निकृष्ट काम निदर्शनास आणून दिले, तरीही त्याची दखल घेतली नाही. काम निकृष्ट दर्जाचे असून, त्यापेक्षा ग्रामपंचायतीच्या वतीने गल्लीबोळातील रस्ते दणदणीत आहेत. - मधुकर जांभळे (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)