मुश्रीफांच्या वाढदिनानिमित्त मरणोत्तर अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST2021-04-24T04:23:34+5:302021-04-24T04:23:34+5:30
कागल : ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून येथील शाहू काॅलनीतील शकुंतला वसंतराव निंबाळकर ...

मुश्रीफांच्या वाढदिनानिमित्त मरणोत्तर अवयवदान
कागल : ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून येथील शाहू काॅलनीतील शकुंतला वसंतराव निंबाळकर यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचे जाहीर केले. कागल ग्रामीण रुग्णालयात जाऊन तसा फॉर्म त्यांनी डाॅ. साधना मदने यांच्याकडे सुपुर्द केला.
कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी यांच्या त्या सासू आहेत. संजय चितारी आणि अनिता चितारी या दाम्पत्याने यापूर्वीच मरणोत्तर देहदान जाहीर केले आहे; तर चितारी कुटुंबातील पाचजणांनी अवयवदानाचे फाॅर्म भरले आहेत. हे सर्व उपक्रम मंत्री मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अवयवदानाचा उपक्रम केला.
फोटो कॅप्शन
कागल येथील शकुंतला निंबाळकर यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा फाॅर्म डाॅ. साधना मदने यांच्याकडे दिला. यावेळी संजय चितारी, चेतन निंबाळकर, अनिता चितारी, संकेत चितारी, निशांत जाधव उपस्थित होते.
२३ कागल अवयवदान