शाहीर नायकवडींकडून कोरोना जागृतीचा पोवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST2021-05-21T04:24:09+5:302021-05-21T04:24:09+5:30

कोल्हापूर : शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांनी कोरेाना जागृतीचा पोवाडा तयार केला असून, तो ...

Poroda of Corona Awakening from Shahir Nayakwadi | शाहीर नायकवडींकडून कोरोना जागृतीचा पोवाडा

शाहीर नायकवडींकडून कोरोना जागृतीचा पोवाडा

कोल्हापूर : शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांनी कोरेाना जागृतीचा पोवाडा तयार केला असून, तो आता संपूर्ण जिल्ह्यात प्रसारित आणि प्रक्षेपित केला जाणार आहे. यामध्ये कोरोनाच्या काळात नागरिकांना घ्यावयाची काळजी कवनाच्या रूपाने मांडण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या संकल्पनेतून माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये डॉ. नायकवडी यांनी एकीकडे कोरोना काळात दक्षता घेण्याची मांडणी केली असून, चित्रफितीमध्ये अनेक दृश्यांचा आणि चित्रांचा प्रभावी वापर केला आहे.

किरण लोहार, युवराज पुजारी, अरूण शिंदे यांचा कोरस असून, विक्रम परिट, ओंकार सुतार यांचे संगीत संयोजन आहे. सनी कलिकते आणि हर्ष नेमाणे यांनी ही चित्रफित तयार केली आहे. सर्व गावांमध्ये जनजागरणासाठी या पोवाड्याचा वापर करण्यात येणार असल्याचे संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Poroda of Corona Awakening from Shahir Nayakwadi