मुरगूडच्या महिला मल्लांकडून आठ पदकांची लयलूट

By Admin | Updated: March 22, 2016 01:02 IST2016-03-22T01:02:43+5:302016-03-22T01:02:43+5:30

पुणे महापौर चषक स्पर्धा : तब्बल अडीच लाखांची बक्षिसे पटकावली

Poor women's wrestling championship of eight medals | मुरगूडच्या महिला मल्लांकडून आठ पदकांची लयलूट

मुरगूडच्या महिला मल्लांकडून आठ पदकांची लयलूट

मुरगूड : पुणे येथे झालेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सर्वच वजनी गटामध्ये मुरगूड (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलातील महिला मल्लांनी वर्चस्व मिळविले. विविध वजनी गटात सहभागी झालेल्या आठ महिला मल्लांनी तब्बल अडीच लाखांच्या बक्षिसांबरोबरच आठ पदकांची कमाई केली आहे. राज्यातील सर्वांत जास्त पदके, बक्षिसे मिळविणारे एकमेव मुरगूडचे कुस्ती केंद्र कौतुकास पात्र ठरले आहे.
५३ किलो वजनी गटात सलग तिसऱ्यावर्षी स्वाती संजय शिंदेने सुवर्णपदक पटकावले. तिला रोख ४० हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. तिने पहिल्या फेरीमध्ये ठाणेच्या कोमल देसाईला भरंदाज डावावर १०-० अशा फरकाने पराभूत केले. कोल्हापूरच्या राधा पाटीलला उपांत्य सामन्यात, तर अंतिम फेरीत जळगावच्या रुपाली महाजनला मोळी डावावर चितपट करत स्वातीने सुवर्ण पदक पटकाविले. ५५ किलो वजनी गटात नंदिनी बाजीराव साळोखेनेही सलग तिसऱ्यावर्षी सुवर्णपदक पटकावले. पहिल्या फेरीत पुण्याच्या तृप्ती तांगडेला कलाजंग डावावर १० गुण फरकाने, तर दुसऱ्या फेरीत ठाणेच्या मोनाली साळुंखेला दुहेरी पट काढून चितपट केले. अंतिम फेरीत मुरगूडच्या अंकिता शिंदेला नंदिनीने मोळी डावावर चितपट केले. तिला सन्मानचिन्ह व ४० हजार रुपये देऊन गौरविले. ५५ किलो गटात अंकिता आनंदा शिंदे हिला रौप्यपदक व ३० हजार रुपये, ६९ किलो गटात वैष्णवी रामा कुशाप्पालाही रौप्यपदक आणि ४० हजार रुपये. ४८ किलो गटात अनुष्का भारत भाटला कांस्यपदक व २० हजार रुपये. ५८ किलो वजनी गटामध्ये तेजश्री मारुती मेंडकेला कांस्यपदक व २० हजार रुपये. ६० किलो वजनी गटात सृष्टी जयवंत भोसले हिला कांस्यपदक व २० हजार रुपये रोख, तर ६३ किलो वजनी गटात प्रियांका सुखदेव येरूडकर हिला कांस्यपदक आणि २५ हजार रुपये देऊन सन्मानित केले.
या आखाड्याला दोन सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदके मिळाली. या सर्व मल्लांना कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक दादासो लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Poor women's wrestling championship of eight medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.