‘ताराबाई गार्डन’ची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:19+5:302021-08-20T04:28:19+5:30
ताराबाई पार्क व न्यू शाहूपुरीतील नागरिकांना सकाळ प्रहरी फिरण्यासाठी ताराबाई गार्डनचा मोठा आधार आहे. मात्र, गेल्या साडेचार महिन्यांपासून हे ...

‘ताराबाई गार्डन’ची दुरवस्था
ताराबाई पार्क व न्यू शाहूपुरीतील नागरिकांना सकाळ प्रहरी फिरण्यासाठी ताराबाई गार्डनचा मोठा आधार आहे. मात्र, गेल्या साडेचार महिन्यांपासून हे उद्यान बंद आहे. त्यामुळे उंच गवत व उद्यानातून गेलेल्या उघड्या ड्रेनेज लाईनमुळे डेंग्यूसारख्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साठलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या डासांमुळे नागरिकांना डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. डेंग्यू व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच असल्यामुळे डाॅक्टरही प्रत्येकास कोविड अँटिजेन टेस्ट करावयास लावत आहेत. त्याचाही नागरिकांना शे-पाचशेचा भुर्दंड पडत आहे. याशिवाय उद्यानात विजेच्या ताराही लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसांत उद्यानाची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन महापालिका उद्यान अधीक्षकांनाही दिले आहे. यावेळी अमर हिरकुडे, संजय घाटगे, डाॅ. शिवाजीराव भोई, दिनकर गुरव, शुभांगी पाटील, राजेंद्र करंबळी, मारुती चावला, डाॅ. उद्यम व्होरा, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो : १९०८२०२१-कोल-ताराबाई गार्डन
आेळी : न्यू शाहूपुरीतील ताराबाई गार्डनमध्ये ड्रेनेज पाईपलाईनचे पाणी सर्वत्र पसरल्यामुळे दुरवस्था व दुर्गंधी पसरली आहे.