निमशिरगावमध्ये गटारी रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:34+5:302021-07-14T04:28:34+5:30
उदगाव : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे कचऱ्याचे ढीग साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक हैराण झाले ...

निमशिरगावमध्ये गटारी रस्त्यांची दुरवस्था
उदगाव : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे कचऱ्याचे ढीग साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे येथे फिरणाऱ्या जनावरांना धोका निर्माण झाला असून त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. याकडे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गालगत निमशिरगाव हे छोटेसे गाव असून, येथे मोठ्या प्रमाणात रस्त्याकडेला असणारे मोठे दगड गटारीत पडल्यामुळे गटारी तुंबल्या आहेत. त्याचे पर्यावसन दुर्गंधी व डास उत्पत्ती झाल्याने साथीचे रोग पसरत आहेत. तसेच मोकळ्या जागेत प्लॅस्टिक कचरा साचल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याकडे ग्रामसेवक विजय कोळी यांचे दुर्लक्ष असून तातडीने यावर मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
चौकट - एका दिवसात बारा रुग्ण
निमशिरगावसारख्या छोट्याशा गावात एका दिवसात कोरोनाचे तब्बल बारा रुग्ण सापडले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात व ग्रामसेवकांनी पूर्णवेळ देऊन गावाला कोरोनापासून मुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
फोटो - १३०७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील मोकळ्या जागेत प्लॅस्टिक कचरा साचल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.