शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

गणेशमूर्ती विसर्जनासाठी ९० ठिकाणी कुंड ठेवणार, महापालिकेचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:09 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या त्या प्रभागांमध्ये करण्याचे नियोजन आहे. परिसरातील मैदो, मोकळ्या जागा, रिकाम्या जागा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे गणेशमूर्ती विसर्जनासाठी ९० ठिकाणी कुंड ठेवणार, महापालिकेचे नियोजनशासन आदेशामुळे रंकाळ्यासह पंचगंगा नदीत विसर्जनास प्रतिबंध

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या त्या प्रभागांमध्ये करण्याचे नियोजन आहे. परिसरातील मैदो, मोकळ्या जागा, रिकाम्या जागा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत.

राज्य शासनाकडून दरवर्षी ज्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाला प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामुळे पंचगंगा नदी, रंकाळा तलाव येथे विसर्जन करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ९० ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने राज्य शासनाकडून घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जनासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये दरवर्षी ज्या परिसरात गर्दी होते, तेथे गणपती विसर्जनासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

यानुसार पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव या परिसरात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी न येता ज्या-त्या प्रभागांमध्येच विसर्जन करण्याची सुविधा देण्याचे नियोजन महापालिकेच्या प्रशासनाकडून सुरू आहे. दोन दिवसांत अंतिम नियोजन होणार असून, ते जाहीर केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनाने दिली आहे.प्रत्येक प्रभागात तात्पुरते विसर्जन कुंडमहापालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्याचे नियोजन आहे. शहरातील रिकाम्या जागा, मैदाने, खुल्या जागा अशा किमान ९० ठिकाणी विसर्जन कुंड ठेवले जाणार आहेत. या ठिकाणी संकलित होणाऱ्या गणेशमूर्ती ट्रॅक्टरच्या साह्याने नेऊन महापालिकेचे कर्मचारी इराणी खण येथे त्यांचे विसर्जन करणार आहेत. यासाठी २०० ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर घेतले आहेत.निर्माल्याची खतनिर्मितीविसर्जन कुंड येथे निर्माल्य संकलित केले जाणार आहे. संकलित होणारे निर्माल्य एकटी व अवनि या संस्थांना खतनिर्मितीसाठी दिले जाणार आहे. याचबरोबर परिसरातील उद्यानांमध्ये ही निर्माल्य स्वीकारून त्या ठिकाणीही खतनिर्मिती करण्याचे नियोजन आहे.

नागरिकांनीही मूर्ती आणण्यासाठी गर्दी टाळावीसोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी महापालिकेकडून गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनासाठी नियोजन सुरू आहे. कुंभार बांधवांनी शक्यतो गणपतीच्या मूर्ती एकाच ठिकाणी न देता वेगवेगळ्या ठिकाणी देण्याची सोय करावी. मूर्ती लहान असावी. नागरिकांनीही मूर्ती आणण्यासाठी गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दहा बाय दहा फूट मंडपाला परवानगीसार्वजनिक गणेशोत्सवासाठी दहा बाय दहा फूट मंडपाला परवानगी देण्यात आली आहे. मूर्तीची उंची चार फूट ठेवण्यात यावी. आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. देखावे सादर करण्यास बंदी आहे. ज्या मंडळांच्या ठिकाणी गर्दी होते. अशा मंडळांनी दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा द्याव्यात. विसर्जन मार्गावर स्वागत कक्षाला परवानगी नसेल. मंडळांनीही घरगुतीप्रमाणे प्रभागांमध्ये मूर्तीचे विसर्जन करावे, अशा सूचना राज्य शासनाने केल्या आहेत.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर