कासारी नदीत रासायनिक मळीमिश्रीत पाण्याचे प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST2021-05-18T04:26:01+5:302021-05-18T04:26:01+5:30
गेली दोन दिवस चक्रीवादळाने झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या कंपोस्ट खत प्रकल्पामधून सांडमळीचे दूषित पाणी ...

कासारी नदीत रासायनिक मळीमिश्रीत पाण्याचे प्रदूषण
गेली दोन दिवस चक्रीवादळाने झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या कंपोस्ट खत प्रकल्पामधून सांडमळीचे दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर यवलूज गावच्या मुख्य ओढ्याव्दारे थेट कासारी नदीपात्रात जात आहे. पाणी प्रदूषणाचा घातक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याने नदीकाठाच्या गावातील नागरीकांतुन कुंभी कारखाना प्रशासनाविरुद्ध चिड निर्माण झाली आहे.
कासारी नदीमधील प्रदूषणप्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने यापूर्वी कुंभी साखर कारखाना प्रशासनाला जबाबदार धरून दंडात्मक कारवाई केली आहे; परंतु दरवर्षी ऐन पावसाळ्यात हुकमी या प्रकल्पातून मळीमिश्रीत दूषित पाणी रात्रीच्या सुमारास यवलूज गावओढ्यातुन कासारी नदीपात्रात सोडले जात असल्याने अजून कितीकाळ या काळ्या पाण्याच विष नागरिकांना पाजणार आहात, असा संतप्त सवाल कुंभी साखर कारखाना प्रशासनास नदीकाठच्या गावांतून विचारला जात असून यानिमित्ताने यवलूज आणि निटवडे गावातील नागरिकांच्या आरोग्यांचा प्रश्न पुन्हा नव्याने ऐरणीवर आला आहे.
चौकट -
कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक झाली असतानाच कुंभी साखर कारखान्याच्या सातार्डे खत प्रकल्पातून वाहत असलेले सायनिक दूषित पाणी कासारी नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे खबरदारी घेऊन नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
फोटो ओळ - यवलूज गावओढ्यातून वाहत असलेले मळीमिश्रीत दूषित पाणी.