शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

‘गोकुळ’चे राजकारण : राहुल आवाडेंसह चार ठराव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 14:47 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी शुक्रवारी चार ठराव सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे सादर झाले. यामध्ये करवीर, हातकणंगलेमधील प्रत्येकी एक, तर शिरोळमधील दोन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल प्रकाश आवाडे यांच्या नावे श्रीकृष्ण सहकारी दूध संस्था, इचलकरंजी संस्थेचा ठराव दाखल झाला.

ठळक मुद्दे‘गोकुळ’चे राजकारण : राहुल आवाडेंसह चार ठराव दाखलसंचालकांकडे मोठ्या संख्येने ठराव जमा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी शुक्रवारी चार ठराव सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे सादर झाले. यामध्ये करवीर, हातकणंगलेमधील प्रत्येकी एक, तर शिरोळमधील दोन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल प्रकाश आवाडे यांच्या नावे श्रीकृष्ण सहकारी दूध संस्था, इचलकरंजी संस्थेचा ठराव दाखल झाला.‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. २३)पासून संघाशी ३६५९ प्राथमिक दूध संस्था सभासद असून, प्रारूप यादी तयार करण्यासाठी प्रतिनिधींच्या नावाचे ठराव मागविले आहेत. सोमवारी व मंगळवारी प्रत्येकी एकच ठराव निबंधक कार्यालयाकडे दाखल झाला होता. बुधवारी (दि. २५) सुट्टी होती, गुरुवारी ७ ठराव दाखल झाले. शुक्रवारपासून गर्दी होईल, असा अंदाज होता; मात्र केवळ चारच ठराव दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या नावाने एक दाखल झाला आहे.संस्थांच्या पातळीवर ठराव करण्याचे काम सुरू असले, तरी ते ठराव त्या त्या तालुक्यांतील संचालकांकडे जमा केले जात आहेत. प्रत्येक संचालकाने ठराव करून घेण्यापासून आपल्याकडे घेण्यापर्यंत यंत्रणा सतर्क ठेवली आहे. ठरावांच्या संख्येवरच उमेदवारीचे भवितव्य असल्याने प्रत्येकाने ठरावासाठी कंबर कसली आहे. ठराव दाखल करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदत असली, तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संचालक एकगठ्ठा ठराव नेत्यांकडे जमा करतील. त्यानंतर ते सहायक निबंधक कार्यालयाकडे दिले जातील.शुक्रवारी दाखल झालेले ठराव असे -संस्था                                        तालुका                    ठरावधारक

  • यशवंत, येवती                           करवीर                 मिलनसिंह आबासो पाटील
  • श्री कृष्ण, इचलकरंजी               हातकणंगले           राहुल प्रकाश आवाडे
  • हनुमान, मौजे आगर-कांबर्डेे      शिरोळ                रंगराव तुकाराम नारिंगकर
  • दत्त, हरोली                              शिरोळ               शांतीनाथ बाबासो पाटील

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर