शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’चे राजकारण : डोंगळे, रणजित पाटील हे पर्याय शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 10:46 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या ( गोकुळ ) अध्यक्ष बदलाचे वारे वाहत असले तरी मुळात बदल होणार ...

ठळक मुद्दे ‘गोकुळ’चे राजकारण : डोंगळे, रणजित पाटील हे पर्याय शक्यअध्यक्ष बदल होणार का हाच कळीचा प्रश्र्न 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष बदलाचे वारे वाहत असले तरी मुळात बदल होणार का व झाला तर संधी कुणाला याभोवती सध्या संघाचे राजकारण फिरत आहे.

संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी १४ डिसेंबरला त्यासाठी बैठक बोलवली असली तरी त्यातून कांही निर्णय होण्याची शक्यता धूसर आहे. ज्यांना बदल हवा आहे त्यांनीही बदल करा, नाहीतर नाही म्हणून तरी सांगा अशी भूमिका घेत बदलाच्या मागणीतच निम्मी माघार घेतली आहे.अध्यक्ष विश्र्वास पाटील यांना सलग तीन वर्षे पदाची संधी मिळाली आहे. तिन्ही वर्षे त्यांना संघाची वार्षिक सभा नीट हाताळता आली नाही असा त्यांच्यावर मुख्य आक्षेप आहे. त्यांना पुरेशी संधी मिळाल्याने बदल करण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे.ती करण्यात अरुण डोंगळे, रणजित पाटील,रविंद्र आपटे यांचा पुढाकार आहे.

अध्यक्ष पाटील हे करवीर विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत त्यांच्याकडेच अध्यक्षपद राहावे यासाठी पी. एन. पाटील आग्रही राहू शकतात.

तालुक्याच्या राजकारणात ते नरके गटाचे विरोधक आहेत ही देखील त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे पी. एन. यांचा पहिला प्रयत्न अध्यक्ष बदल विधानसभा निवडणूकीनंतरच करु असाच राहील. परंतू त्यातूनही संचालकांतून फारच आग्रह झाला तर त्यासाठी अरुण डोंगळे व रणजित पाटील यांचा विचार होवू शकतो.

अरुण डोंगळे आक्रमक आहेत. भोगावती कारखान्यांत ते पी. एन. पाटील यांच्यासोबत आहेत. शिवाय विधानसभा निवडणूकीतही त्यांचा उपयोग होवू शकतो. डोंगळे यांच्या नांवास महाडिक कितपत तयार होतात हे महत्वाचे आहे. रविंद्र आपटे हे दोन्ही नेत्यांना चालणारे संचालक आहेत परंतू त्यांची प्रकृती साथ देत नसल्याचे सांगण्यात येते.

रणजित पाटील हे देखील प्रबळ दावेदार आहेत. ते दोन्ही घाटगे गटांना चालू शकतात. आगामी लोकसभा निवडणूकीत बेरजेचे राजकारण करून कागल तालुक्यांतून मदत मिळावी यासाठी दोन्ही घाटगे गटात समझोता घडवून आणण्यासाठी महाडिक प्रयत्नशील आहेत. त्याचा भाग म्हणून अंबरिश घाटगे यांना गोकुळमध्ये संधी देवून समरजित घाटगे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा केला जाण्याचीही एक शक्यता आहे.लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर, तर विधानसभा आठ महिन्यांवर आल्याने त्या अनुषंगाने नेत्यांना सोईचा होईल असाच अध्यक्ष निवडण्याला प्राधान्य असेल. इच्छुक म्हणून पुढे आलेली नावे ही महाडिक व पी.एन यांच्या परस्परविरोधी असल्याने त्यात कसे एकमत होणार हाच कळीचा प्रश्र्न आहे. सद्यस्थितीत महाडिक हे पी.एन.यांना डावलून कांही करण्याची शक्यता नाही. जे कांही होईल ते दोघांच्या संमतीनेच असे आजचे चित्र आहे.

बदल करायचा की नाही याचा कोणताही निर्णय या क्षणाला आम्ही घेतलेला नाही. मी व पी.एन.पाटील १४ तारखेला एकत्र बसू व त्यानंतरच याचा निर्णय होईल. युध्दाला सामोरे गेल्यावर समोरच्याला गोळी घालायची की तेथून पळून यायचे हे त्यावेळी ठरवायचे अशी महाडिक यांची कार्यपध्दती आहे.महादेवराव महाडिकगोकुळचे नेते

अगोदर नेत्यांची चर्चायेत्या १४ तारखेला दुपारी १२ वाजता संघाच्या ताराबाई पार्कातील मुख्यालयात अगोदर महाडिक व पी.एन. हे दोघेच एकत्र बसणार आहेत. त्यानंतर मग संचालकांशी चर्चा केली जाणार आहे. मते आजमावून घेण्याची पध्दत संघात नाही. त्यामुळे संचालक सांगतील ते नेते ऐकून घेतील व जो निर्णय देतील त्यानुसार घडेल. संघात बंड वगैरे कधी होत नाही ते गेल्या तीस वर्षात झालेले नाही व यापुढेही होणार नाही असे महाडिक यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर