शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आवाडे गटाच्या राजकारणाने समीकरणे बदलली : ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे आखाड्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:17 AM

आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांचा समावेश हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये झाल्यापासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामध्ये आवळे -आवाडे गटामध्ये २००४ पासून राजकीय संघर्ष उफाळून आला होता.

दत्ता बिडकर।हातकणंगले : हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये आवाडे गटाच्या बदलत्या राजकीय निर्णयाने काँग्रेसबरोबर शिवसेनेचेही मोठे नुकसान झाले आहे. २००४ पासून काँग्रेसच्या आवळे गटाला असहकार्य करणारा आवाडे गट शिवसेनेच्या सुजित मिणचेकर यांना नेहमीच सहकार्य करीत आल्यामुळे दोन वेळा या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला.यावेळी आवाडे गट ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यामुळे शिवसेनेच्या सुजित मिणचेकर गटात चिंता वाढली असून, या मतदारसंघामध्ये अधिकच रंगत येणार आहे.

हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये दररोज वेगवेगळे संदर्भ समोर येत आहेत. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडून पक्षाला रामराम ठोकल्याने तालुक्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांचा समावेश हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये झाल्यापासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले आहे. या १३ गावांबरोबरच जवाहर साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि आवाडे समूहाचे इतर लहान-मोठे उद्योग-व्यवसाय याच मतदारसंघात असल्याने आवाडे गटाचा हातकणंगलेत दबदबा आहे. आवाडे गटाच्या चोरीछुपे पाठिंब्यावरच या मतदारसंघाची समीकरणे प्रत्येकवेळी बदलली आहेत. या निवडणुकीमध्ये आवाडे गट ताराराणी आघाडीच्या माध्यमातूनउघडपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने त्यांच्या एकगठ्ठा मताचा फटका काँग्रेस आणि शिवसेनेला बसणार आहे.काँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामध्ये आवळे -आवाडे गटामध्ये २००४ पासून राजकीय संघर्ष उफाळून आला होता.

२००४ च्या निवडणुकीमध्ये आवाडे गटाने जनसुराज्यच्या राजीव आवळे यांना छुपा पाठिंबा देऊन तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री जयवंतराव आवळे यांचा पराभव केला. २००९ च्या निवडणुकीच्या राजकीय साठमारीमध्ये आवाडे गटाचे कार्यकर्ते जनसुराज्य आणि शिवसेनेकडे विभागले गेले आणि काँग्रेसचे राजू जयवंत आवळे फक्त २००० मतांनी पराभूत झाले.दोन आवळेंच्या भाऊबंदकीमध्ये शिवसेनेचे सुजित मिणचेकर निवडून आले. २०१४च्या निर्णायक निवडणुकीमध्ये पुन्हा आवाडे गटाने काँग्रेस पक्षाशी फारकत घेत आपले सर्व कार्यकर्ते चोरीछुपे शिवसेनेच्या पाठीशी उभे केले आणि जयवंतराव आवळेंचा पराभव झाला.

आवाडे गटाच्या सहकार्यामुळे शिवसेनेचे सुजित मिणचेकर दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले.आवाडे गटाकडून हातकणंगले मतदारसंघामध्ये लढण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे दोन माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे (हुपरी), शामराव गायकवाड (रुकडी), तसेच गतवेळी राष्ट्रवादीकडून लढलेले दत्ता घाटगे (मिणचे) यांच्यासह ऐनवेळी वेगळेच नाव समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आवाडेगटाच्या लढण्याने या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे मोठे नुकसान होणार असून, या मतदारसंघाचे चित्र बदलणार आहे, हे मात्र नक्की आहे.ताकद दाखवावी लागणारविधानसभेमध्ये आवाडे गटाने काँग्रेसशी फारकत घेऊन ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेकडे जाणारी मते यावेळी थांबली आहेत. आवाडे गटाच्या अस्तित्वासाठी यावेळी त्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर