विषय समित्यांच्या निवडीसाठी मध्यरात्रीपर्यंत राजकीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:05+5:302021-01-08T05:22:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नगरपालिका विविध विषय समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती. त्यामुळे ...

विषय समित्यांच्या निवडीसाठी मध्यरात्रीपर्यंत राजकीय
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिका विविध विषय समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली आघाडी कायम राहणार की, त्यामध्ये फेरबदल होणार, याकडे लक्ष लागले आहे.
सध्या नगरपालिकेमध्ये भाजप, कॉँग्रेस (आवाडे गट) व राजर्षी शाहू विकास आघाडी यांची सत्ता आहे. त्यामध्ये फेरबदल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या. आमदार आवाडे कामगार कल्याणकारी मंडळासंदर्भात बैठकीसाठी मुंबईला गेले होते. ते रात्री उशिरा परतणार असल्याने मध्यरात्रीपर्यंत घडामोडी सुरू होत्या. सत्तेमध्ये बदल होण्याचे स्पष्ट संकेत नसल्याने विद्यमान आघाडीमधील बांधकाम सभापतिपदासाठी उदयसिंह पाटील, पाणीपुरवठा सभापतिपदासाठी दीपक सुर्वे, आरोग्य युवराज माळी व मनोज साळुंखे, तर महिला बालकल्याण समितीसाठी शकुंतला मुळीक यांची नावे आघाडीवर आहेत. या सर्व राजकीय घडामोडींमुळे नगरपालिकेत दिवसभर शुकशुकाट होता.