शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चंदगड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी राजकीय खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:21 IST

चंदगड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावा-गावातील राजकीय वातावरण तापू लागले ...

चंदगड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावा-गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शासन सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार असल्याने निवडणुकीतील ईर्ष्याच कमी झाली आहे.

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गल्ली-बोळातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तालुक्यात राजकीय पक्षांपेक्षा गटाच्या राजकारणाला महत्त्व आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी व वैयक्तिक भेटीगाठी घेऊन आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

आमदार राजेश पाटील यांच्या म्हाळेवाडी व माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या बसर्गे, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या कोवाड, तर माजी सभापती शांताराम पाटील यांच्या धुमडेवाडी, माजी सभापती भरमाण्णा गावडे यांच्या हलकर्णीसह कालकुंद्री, राजगोळी बुद्रुक, मांडेदुर्ग, दाटे, हजगोळी, किणी, मलतवाडी, नांदवडे, शिनोळी व तुडये या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांत निवडणूक होत असल्याने लोकप्रतिनिधींचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तालुक्यात १५ वर्षांपूर्वी भरमू पाटील गट विरुद्ध नरसिंगराव पाटील गट अशी लढत व्हायची. कालांतराने दौलत कारखान्याच्या संघर्षातून गोपाळराव पाटील हे नवे नेतृत्व उदयाला आले. अलीकडच्या दशकात संभाजीराव शिरोलीकर, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अप्पी पाटील, शिवाजी पाटील असे नवे नेतृत्व उदयाला आले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. हजगोळी, हलकर्णी, होसूर, इब्राहिमपूर, कळसगादे, कानडी, करेकुंडी, केरवडे-वाळकुळी, किणी, मलतवाडी, मुगळी, नागवे-ईनाम, कोळींद्रे, नांदवडे, पुंद्रा, सुरुते, शिनोळी खुर्द, तुडये, चिंचणे, बुक्कीहाळ, देवरवाडी, ढोलगरवाडी, धुमडेवाडी, जांबरे, कौलगे, किटवाड, माडवळे, म्हाळेवाडी, पाटणे, सुंडी, तावरेवाडी, कालकुंद्री, कोवाड, राजगोळी बुद्रुक, मांडेदुर्ग, आसगाव, बसर्गे, बागिलगे, बोंजुर्डी, दाटे, दिंडलकोप, घुल्लेवाडी या गावांत निवडणुका होत आहेत.