शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

राजकीय वर्चस्वातून होरपळले पाचगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:19 IST

कोल्हापूर : राजकीय वैमनस्यातून पाचगाववर वर्चस्व कोणाचे? यावरून ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक पाटील आणि धनाजी तानाजी गाडगीळ या दोघांचा ‘खुनाचा बदला खून’ यातून सूडसत्र पाच वर्षांपूर्वी घडले. त्यानंतर आजही दहशतीच्या छायेखाली पाचगाव राहिले आहे. त्यातून दोन्हीही गटांकडील एकूण ११ जण कळंबा कारागृहात गजाआड होते.पाचगाव ग्रामपंचायतीच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत वर्चस्व कोणाचे, ...

कोल्हापूर : राजकीय वैमनस्यातून पाचगाववर वर्चस्व कोणाचे? यावरून ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक पाटील आणि धनाजी तानाजी गाडगीळ या दोघांचा ‘खुनाचा बदला खून’ यातून सूडसत्र पाच वर्षांपूर्वी घडले. त्यानंतर आजही दहशतीच्या छायेखाली पाचगाव राहिले आहे. त्यातून दोन्हीही गटांकडील एकूण ११ जण कळंबा कारागृहात गजाआड होते.पाचगाव ग्रामपंचायतीच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत वर्चस्व कोणाचे, यावरून दिलीप जाधव विरुद्ध अशोक पाटील यांच्यात अनेक महिने वाद धुमसत होता. तो निवडणुकीच्या निमित्ताने उफाळला. ग्रामपंचायत निवडणुकीत दिलीप जाधव गटाच्या बाजूने बहुमत मिळाले; पण सरपंचपद हे महिला मागास प्रतिनिधीसाठी राखीव असल्याने त्या गटातून जाधव यांच्याकडे कोणीही विजयी झाले नव्हते, तर अशोक पाटील यांच्या गटाकडे बहुमत नसले तरी सरपंचपदासाठीच्या शोभा भालकर या विजयी झाल्या होत्या. प्रत्यक्ष सरपंच निवडीवेळी दिलीप जाधव गटाच्या राधिका बराले यांनी आपण मागासवर्गीय असल्याचा दाखला आणून बहुमताच्या जोरावर सरपंचपद मिळविले. त्यातून दोन्ही गटांत एकमेकाला वारंवार धमक्या देण्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यातून गटात राग खदखदत होता.आरोपींना कोगनोळी नाक्यावर अटकदि. १३ फेब्रुवारी २०१३ ला अशोक पाटील हे मित्र उत्तम भोसले, शकील बंडवल, अरुण पाटील, निशांत मानेसोबत घरातून मोटारीतून (एमएच ०९ सीएन ९९९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास न्यू महाद्वार रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेत चेक घेऊन आले. तेथे अशोक पाटील बँकेच्या दारात मोबाईलवर बोलत उभा असताना अचानक दिलीप जाधव आणि अमोल जाधव तेथे आले व त्यांनी अशोक पाटीलवर गावठी पिस्तूलमधून गोळीबारा केला. त्यात पाटील यांच्या डोक्यातून दोन गोळ्या आरपार गेल्याने ते जागीच ठार झाले. यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा करून तेथे पिस्तूलमधील पुंगळ्या, गोळ्यांचे तुकडे मिळाले. मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालय परिसरात पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर गोपनीय माहितीनुसाार पोलिसांनी पाचही आरोपींना कोगनोळी नाक्यावर दोन दुचाकीवरून पळून जाताना पकडले. त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या बॅगमध्ये गावठी पिस्तूल मिळाले. हे पिस्तूल नंतर तपासणीसाठी सांताकृझला पाठविले होते. त्यांनीही या पिस्तूलमधून गोेळ्या झाडल्याचा अहवाल दिला. त्यावेळेपासून सर्व आरोपी हे कळंबा कारागृहातच होते.धनाजीच्या खुनातून बदलाअशोक पाटीलच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा गट अतूर होता; पण दिलीप जाधवसह आरोपी हे कारागृहात असताना त्याच्या कुटुंबियांना मदत करणारा दिलीपचा मेहुणा धनाजी गाडगीळ यात बळी ठरला. २३ डिसेंबर २०१३ ला रात्री पाचगावमध्ये एकाचा वाढदिवस साजरा करताना तेथे धनाजी गाडगीळ गेला होता. त्याचवेळी अशोक पाटील गटाने धनाजीला गाठून त्याच्यावर जांबिया, तलवार, कोयत्याने हल्ला करून ठार केले. त्यावेळी आडवा आल्याने फिर्यादी अमर बावडेकर हाही जखमी झाला होता. त्यातून पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून १० संशयितांना अटक करून खटला चालविला होता. घटनास्थळी एक दुचाकी व जांबिया मिळाला होता.डिजिटल लावण्याचे नियोजन?या खून खटल्यात एका गटाकडून पाण्याच्या खजिन्यापासून ते पाचगावपर्यंत डिजिटल लावण्याचे सोमवारी नियोजन केले असल्याची चर्चा शहरात सुरू होती; पण दोन्ही गटांना शिक्षा झाल्याने त्याच्यावर पाणी फेरले.तडजोडीचा प्रयत्न असफल...अशोक पाटील व दिलीप जाधव यांच्या गटात तडजोडीचा प्रयत्न नेत्यांनी केला; पण एका गटाला वाटत होते की, आपण निर्दोष सुटणार. त्यामुळे दोन्ही गटांच्या तडजोडीचा प्रयत्न असफल झाला.दोन्ही गटांत चार भावंडेअशोक पाटील याच्या खूनप्रकरणी शिक्षा झालेल्या पाचजणांमध्ये दिलीप आणि अमोल जाधव हे सावत्र भाऊ, तर धनाजी गाडगीळ प्रकरणात मृत अशोक पाटीलची मुले महेश आणि मिलिंद यांचा समावेश आहे. दोन्ही गटांकडून भावंडांना शिक्षा झाली.गाडगीळ खून खटल्यात २३ साक्षीदारांपैकी चार फितूर झाले, तर मृतदेहाच्या शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. माधवी श्रीवस्ती यांच्यासह फिर्यादी अमर बावडेकर, स्वप्निल कांबळे, विक्रांत पठाण, विनायक सुतार यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.साक्षीदार व फितूरअशोक जाधव खून खटल्यात एकूण ४३ साक्षीदार तपासले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निशांत माने वगळता इतर २३ जण फितूर झाले; पण घटना घडली त्यावेळी माने हा फेव्हिकॉल आणण्यासाठी शेजारी गेला होता, तर खून घडला त्यावेळी रस्त्याकडेला फुटपाथवर सोमेश साठे (कोल्हापूर) हा तरुण मित्रांसोबत बोलत उभा होता. खुनाची घटना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर सोमेशची प्रकृती बिघडल्याने तो आठ दिवस गायब होता. पोलिसांनी त्याला शोधून काढून त्याची साक्ष नोंदविली. तीच साक्ष शिक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरली.