शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सुजित मिणचेकर यांच्या प्रवेशाने शिंदेसेनेला बळ; कशी बदलली राजकीय समीकरणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:46 IST

मिणचेकर यांच्या राजकीय अस्तित्वासाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मिणचेकर यांचे खास तीन शिलेदार व अन्य ताकदीचे कार्यकर्ते मात्र त्यांच्याबरोबर गेलेले नाहीत.

-आयुब मुल्ला, हातकंगणलेखोची: माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने हातकणंगले तालुक्यातील राजकारणात शिंदेसेनेने बेरजेच्या राजकारणावर भर दिला असल्याचे स्पष्ट होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश पक्ष बळकटीसाठी हातभार लावेल. स्वतः मिणचेकर यांच्या राजकीय अस्तित्वासाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मिणचेकर यांचे खास तीन शिलेदार व अन्य ताकदीचे कार्यकर्ते मात्र त्यांच्याबरोबर गेलेले नाहीत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानसभेनंतर खासदार धैर्यशील माने हे राजकीय जोडण्या भक्कम लावण्यासाठी अधिक सक्रिय झाले आहेत. पारंपरिक विरोधाकडे दुर्लक्ष करीत त्यांनी पक्ष वाढीला महत्त्व दिले आहे. त्यातूनच त्यांनी स्वाभिमानीचे राजेश पाटील (हेरले) यांना पक्षात घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पाटील हे कट्टर विरोधक असून, त्यांनाच समर्थक बनविले. त्यानंतर विरोधक असलेले सुजित मिणचेकर यांना पक्षात आणून आपले बेरजेचे राजकारण सुरू ठेवले. लोकसभेला हातकणंगले तालुक्यातून खासदार माने यांना चांगले

मताधिक्य मिळाले होते. त्या आधारावर त्यांनी विधानसभेला ही जागा शिंदे गटाला मिळावी, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, त्यास यश आले नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र जास्तीच्या जागा निवडून आणण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. वर्चस्व निर्माण करण्यासाठी या निवडणुका जिंकणे प्रतिष्ठेच्या आहेत. माने, महाडिक, कोरे, आवाडे, यड्रावकर हे नेते महायुतीत आहेत. त्यांचे प्रत्येकाचे तालुक्यात गट आहेत. तालुक्याची रचना पाहता वेगवेगळ्या ठिकाणी या गटांची लक्षणीय ताकद आहे.

स्वाभिमानीतून आता शिंदेसेनेत

मिणचेकर हे दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून आमदार झाले. त्यानंतर काँग्रेसच्या आमदार राजू आवळे यांनी त्यांचा पराभव केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविली. त्यांचा जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांच्याकडून दारुण पराभव झाला.

चौगुले, यादव, चव्हाण उद्धवसेनेतच...

उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती प्रवीण यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण हे मिणचेकर यांचे खंदे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मात्र मिणचेकर यांच्याबरोबर जाण्याचे टाळले आहे. त्यांनी आहेत तेथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाRaju Shettyराजू शेट्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरे