शिरोलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:21 IST2021-04-26T04:21:28+5:302021-04-26T04:21:28+5:30

संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांवर शिरोली पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून सुमारे १ लाख ४ ...

Police take action against violators of curfew in Shiroli | शिरोलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई

शिरोलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई

संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांवर शिरोली पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून सुमारे १ लाख ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लोकांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शिरोली एम.आय.डी सी पोलीस ठाण्याने बेशिस्त नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

या ठाण्याअंतर्गत शिरोली पुलाची, नागाव, मौजे वडगाव, टोप, कासारवाडी फाटा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काल रात्री विनामास्क फिरणाऱ्या ६६ नागरिकांना दंड केला आहे. मोटर व्हेईकल ॲक्ट प्रमाणे २० केसेस केल्या आहेत. विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून २४ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

मागील पंधरा दिवसात विनामास्क फिरणाऱ्या ३४६ जणांवर तसेच २०३ वाहनधारकांवर कारवाई करून एक लाख ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर ४६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: Police take action against violators of curfew in Shiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.