शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 12:47 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, गतवर्षी उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षीही आपत्तीजन्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची यंत्रणाही सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देपूरस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज : पोलीस अधीक्षक ५० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

कोल्हापूर : जिल्ह्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, गतवर्षी उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षीही आपत्तीजन्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची यंत्रणाही सज्ज झाली आहे. गरज भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला हे प्रशिक्षित पोलीस मदत करणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.गतवर्षी आंबेवाडी, चिखली, वडणगे या गावांसह शहरातील नागाळा पार्क, बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी, लक्षतीर्थ, कसबा बावडा, आदी भागांना महापुराचा मोठा फटका बसला. महापुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुस्थळी स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस यंत्रणा आणि सेवाभावी संघटनांनी मोठे योगदान दिले.

त्यावेळी पुराच्या पाण्यातून बोटीने मार्ग काढत जाताना पाण्याचा प्रवाह, पाण्याखालील गावांचा भाग, विद्युत खांब, झाडी, मोठ्या इमारती यांची माहिती पोलिसांना नव्हती. त्यातच बोट चालविण्याचे कौशल्य नसल्याने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागले.

परजिल्ह्यांतून बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांना पूरग्रस्त गावांच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नव्हती; पण तशी आपत्कालीन परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास अडचण येऊ नये, ही उणीव ओळखून जिल्हा पोलीस दलातील व पूरग्रस्त क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.या आपत्ती व्यवस्थापनात पूरपरिस्थितीत अडकणारी संभाव्य गावे, त्यांची भौगोलिक रचना, मदतीसाठी तेथे जाण्याचे व परतण्याचे मार्ग, महापुरात बोट चालविण्याचे कौशल्य, पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्यासह जवळपास ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतले आहे.सध्या पावसाचा जोर वाढला असून धरणांतूनही पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्कालीन स्थितीत कोणत्याही क्षणी आवश्यकता वाटल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरPoliceपोलिस