पोलीस सोसायटीस १ कोटी ४२ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:39+5:302021-04-18T04:23:39+5:30
कोल्हापूर : पोलिसांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या कोल्हापूर डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटीस २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४ कोटी २८ ...

पोलीस सोसायटीस १ कोटी ४२ लाखांचा नफा
कोल्हापूर : पोलिसांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या कोल्हापूर डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटीस २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४ कोटी २८ लाखांचा ढोबळ, तर १ कोटी ४२ लाखांचा निव्वळ नफा झाला. संस्थेने एकूण ८७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून खेळते भांडवल ५० कोटी ६० लाख इतके झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय दुर्गुळे व उपाध्यक्ष शिवराम पाटील यांनी दिली.
शासनाच्या सहकार भूषणसह तेरा पुरस्कारांनी संस्थेस सन्मानित करण्यात आले आहे. ठेवी ३४ कोटी २७ लाख, कर्जे ४० कोटी ८० लाख, वसूल भाग भांडवल ६ कोटी ७५ लाख, गुंतवणूक ८ कोटी ४८ लाख, राखीव इतर निधी ५ कोटी ३६ लाख इतका आहे. सोसायटीचा एनपीए शून्य टक्के असून लेखापरीक्षणातही सातत्याने ‘अ’ वर्ग मिळाला आहे. सभासदांनाही १५ टक्के लाभांश देण्यात आलेला आहे. संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनामुळे व सभासदांच्या पाठींब्यामुळे संस्था प्रगती करीत आहे.