फिरस्त्याच्या खूनप्रकरणी पोलिसांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST2021-07-12T04:17:00+5:302021-07-12T04:17:00+5:30

कोल्हापूर : शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावर खून झालेल्या अवस्थेत सापडलेला फिरस्ता बाबासाहेब विष्णू गोसावी (वय ४०, रा. निगवे, ता. करवीर) ...

Police search for Firasta murder case continues | फिरस्त्याच्या खूनप्रकरणी पोलिसांचा शोध सुरू

फिरस्त्याच्या खूनप्रकरणी पोलिसांचा शोध सुरू

कोल्हापूर : शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावर खून झालेल्या अवस्थेत सापडलेला फिरस्ता बाबासाहेब विष्णू गोसावी (वय ४०, रा. निगवे, ता. करवीर) हा कोणत्या फिरस्त्याच्या संपर्कात होता, त्यादृष्टीने करवीर पोलीस तपास करत खून्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

६ जुलैला सायंकाळी शिंगणापूर-हणमंतवाडी रस्त्यावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह शेतानजीक मिळाला. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने करवीर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. पुढे तीन दिवसांत त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. बाबासाहेब गोसावी असे त्याचे नाव असून तो गेली आठ ते दहा वर्षे घरापासून दूर भंगार गोळा करून फिरस्ता म्हणून वावरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा खून होण्यापूर्वी तो कोणत्या फिरस्त्यांच्या संपर्कात आला होता का, त्याने शिवभोजन अगर इतर भोजन कोठे घेतले याचा शोध घेत पोलीस संशयित खून्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

फोटो नं. ११०७२०२१-कोल-बाबासाहेब गोसावी

110721\11kol_4_11072021_5.jpg

फोटो नं. ११०७२०२१-कोल-बाबासाहेब गोसावी

Web Title: Police search for Firasta murder case continues