शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोलिस भरती एका गुणाने हुकली; नैराश्यातून तरुणाने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 12:00 IST

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी झालेल्या पोलिस भरतीत अवघ्या एका गुणाने संधी हुकल्याने जयेंद्र शंकर पाटील (वय २६, रा. सडोली दुमाला, ...

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी झालेल्या पोलिस भरतीत अवघ्या एका गुणाने संधी हुकल्याने जयेंद्र शंकर पाटील (वय २६, रा. सडोली दुमाला, ता. करवीर) याने तणनाशकाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. पोलिस भरतीचे उद्दिष्ट ठेवलेला जयेंद्र अपयशाने नैराश्यात होता. मंगळवारी (दि. १४) त्याने राहत्या घरात इंजेक्शन घेतले होते. उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १६) सकाळी त्याचा मृत्यू झाला. जीव वाचला असता तर आणखी दहा परीक्षा देता आल्या असत्या; परंतु तसा विचारच न केल्याने एक उमदे आयुष्य उमलता उमलता कोमेजून गेले. हाताशी आलेल्या मुलाने अशा पद्धतीने जीवन संपवल्याने कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.सडोली दुमाला येथील जयेंद्र पाटील याने पदवीचे शिक्षण घेतले होते. गेल्या सहा वर्षांपासून तो पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होता. गेल्यावर्षी झालेल्या भरती प्रक्रियेत अवघ्या एका गुणाने त्याची संधी हुकली. त्यानंतर तो नैराश्यात होता. मित्र आणि नातेवाइकांनी अनेकदा त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नैराश्यातून बाहेर आला नाही. मंगळवारी सकाळी त्याने दंडात तणनाशकाचे इंजेक्शन टोचून घेतले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्याला तातडीने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अपयशातून टोकाचा निर्णय घेतल्याने त्याचे कुटुंबीय आणि मित्रांना धक्का बसला. जयेंद्र याच्या पश्चात आई, वडील, बहीण, चुलते, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू