पोलिसांचा संभाजीनगरात छापा : माव्याच्या ७३ पुड्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST2021-06-06T04:17:51+5:302021-06-06T04:17:51+5:30

कोल्हापूर : बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने तयार केलेला ओला माव्याच्या ७३ पुड्या जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्या. याप्रकरणी ...

Police raid in Sambhajinagar: 73 bags of mava seized | पोलिसांचा संभाजीनगरात छापा : माव्याच्या ७३ पुड्या जप्त

पोलिसांचा संभाजीनगरात छापा : माव्याच्या ७३ पुड्या जप्त

कोल्हापूर : बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने तयार केलेला ओला माव्याच्या ७३ पुड्या जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी सुरज ऊर्फ धोनी सुरेश पोवार (वय ३६, रा. ताराराणी काॅलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी रेसकोर्स नाका ते निर्माण चौक रोडवरील हराळे यांच्या खोलीवर छापा टाकून ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरज ऊर्फ धोनी पोवार हा सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, चुना, पाणी असे मिश्रण असलेला ओला मावा तयार करून तो बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हराळे यांच्या खोलीवर छापा टाकून संशयित सुरेश पोवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १४६० रुपये किमतीच्या ओला माव्याच्या ७३ पुड्या जप्त केल्या. कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून विक्री करत असल्याचे मिळून आले. अन्नसुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य व लोकसेवकाचा आदेशाच्या अधिसूचनेचा भंग केल्याने संशयीत पोवार याच्याविरुद्ध सिगारेट ॲंड टोबॅको प्रोडक्टस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police raid in Sambhajinagar: 73 bags of mava seized