शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नांगरे-पाटील यांच्याकडून पोलिसांची झाडाझडती

By admin | Updated: July 22, 2016 00:51 IST

ठाण्यांमध्ये उडाली भंबेरी : शाहूपुरी, लक्ष्मीपुरी ठाण्यांना भेटी

कोल्हापूर : पोलिस ठाण्यातील स्वच्छता, लोकाभिमुख सेवा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांतील तपासाचे पुढे काय झाले, अशी विचारणा गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे केली. शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यांत सायंकाळी नांगरे-पाटील यांनी दूचाकीवरून अचानक भेटी दिल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी नांगरे-पाटील यांनी काहीना शाबासकी, तर काहीना कानपिचक्या दिल्या.गेल्या आठवड्यात नांगरे-पाटील यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर प्रथमच गुरुवारी शाहूपुरी पोलिस ठाण्याला भेट दिली. नांगरे-पाटील आल्याचे समजताच पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी पोलिस ठाण्यातून बाहेर आले. त्यानंतर ते लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पोलिस ठाण्यात स्वच्छता आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी केली. सुमारे २० ते २५ मिनिटे नांगरे-पाटील यांनी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्याशी चर्चा केली व तपासाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी लक्ष्मीपुरी ठाण्यातील कॉन्स्टेबल अभिजित व्हरांबळे व अभिजित घाटगे यांना नांगरे-पाटील यांनी बक्षीस जाहीर केले. या दोघांनी घरफोडीतील संशयित गुन्हेगार उत्तम बारड याने केलेल्या गुन्ह्यांचा तपास कौशल्यरीत्या केला आहे.अधिकाऱ्यांकडेतपासाची विचारणात्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आवाराची, गुन्हे शोध पथक (डी. बी.) सह बिनतारी संदेश यंत्रणा, पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनची पाहणी केली. त्याचबरोबर पोलिस ठाण्यातील स्वच्छता, लोकभिमुख सेवा देता काय? अशी विचारणा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे केली. त्यानंतर प्रत्येक पोलिस गणवेशामध्ये आहे का? याचीही तपासणी केली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा आढावा घेऊन पुढे याचा तपास काय झाला? अशी विचारणा केली.