बंगलोर दरोड्यातील ‘बिल्डर’ला पोलिसांचे अभय

By Admin | Updated: November 28, 2014 00:35 IST2014-11-28T00:35:17+5:302014-11-28T00:35:31+5:30

पोलिसांच्या हेतूबाबत शंका : सराफांमध्ये बिल्डरने केली मांडवली

Police officer's absconding 'builder' in Bangalore dock | बंगलोर दरोड्यातील ‘बिल्डर’ला पोलिसांचे अभय

बंगलोर दरोड्यातील ‘बिल्डर’ला पोलिसांचे अभय

एकनाथ पाटील - कोल्हापूर -बंगलोर दरोड्यात दरोडेखोर आणि सराफांमध्ये सोने-विक्री प्रकरणात मांडवली करणाऱ्या मंगळवार पेठेतील त्या ‘बिल्डर’ला बंगलोर आणि कोल्हापूर पोलिसांनी अभय देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात आहे. बिल्डरसह सराफावर गुन्हा दाखल न करता त्यांना क्लीन चिट देण्यामागे पोलिसांचा हेतू काय असावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात या दोघांकडून पोलिसांनी आपले हात ओले केल्याचे समजते.
बंगलोरमध्ये सराफाचे चार किलो सोने लुटणारे संशयित दरोडेखोर सर्फराज खान, शलाल मकानदार, जावेद शेख, रमीज चाऊस हे चौघे जिवलग मित्र. सांगलीच्या दोघा मित्रांनी मदतीने बिस्किटे, चिप, विटेचा आकार असलेल्या चार किलो सोन्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यासाठी ते धडपडू लागले. नेहमी उठण्या-बसण्यात असणाऱ्या मंगळवार पेठेतील बिल्डर मित्राला त्यांनी हा प्रकार सांगितला. मांडवली करण्यासाठी जाता-जाता लाखो रुपये कमिशन मिळणार असल्याने त्याने आपल्या नेहमीच्या गुजरीतील एका सराफाला गाठले. बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीने सोने त्या सराफाने विकत घेतले. लुटलेल्या सोन्यामध्ये दरोडेखोरांना पैसे मिळाले. सराफाला निम्म्या भावात अस्सल २४ कॅरेटचे सोने मिळाले; तर बिल्डरला मांडवली करण्याचे कमिशन मिळाले. एका वेळी तिघांचा फायदा झाल्याने सर्वजण खूश होते. अखेर बंगलोरच्या पोलिसांना दरोडेखोरांचा कोल्हापुरापर्यंत धागेदोरे लागल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारी रेकॉर्डवर नसणाऱ्या नव्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवीत त्यांना चोरलेल्या सोन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी मंगळवार पेठेतील एका बिल्डरच्या सहकार्याने सराफाला सोने विकल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्या सराफाला गाठले. चोरीचे सोने विकत घेणे आणि मांडवली करणे हादेखील गुन्हाच आहे; त्यामुळे सराफासह बिल्डरच्या पायांखालील वाळू सरकली. बंगलोरचे पोलीस फक्त चौघा दरोडेखोरांना घेऊन गेले. त्या सराफ व बिल्डरवर मात्र कोणतीच कारवाई केली नाही. ...


‘बिल्डर’ची पोलिसांशी मैत्री
मंगळवार पेठेतील ‘त्या’ बिल्डरची जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील काही पोलिसांशी चांगलीच मैत्री आहे. आठ दिवसांपूर्वी रात्री साडेदहाच्या सुमारास काही पोलीस भवानी मंडपासमोर पोलीस व्हॅनजवळ बोलत थांबले होते. यावेळी बुलेटवरून रुबाबात तो बिल्डर पोलिसांजवळ आला. ‘काय साहेब, मी सांगितलेले काम लक्षात आहे नव्हे? बघू आता केव्हा करताय...’ असे म्हणून थोडा वेळ थांबून तो निघून गेला. त्यामुळे त्या बिल्डरची पोलिसांशी चांगलीच लगट असल्याचे दिसून येते.

Web Title: Police officer's absconding 'builder' in Bangalore dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.