पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:24 IST2016-03-19T00:22:58+5:302016-03-19T00:24:20+5:30

उत्कृष्ट कामगिरीचा गौरव : स्थानिक गुन्हे अन्वेषणला ५० हजारांचे बक्षीस

Police Officer, Honor Of Employees | पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

कोल्हापूर : खून, घरफोड्या, चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणणाऱ्या कोल्हापूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. यावेळी कणेरीमठ चोरी व आजरा जळीत गाडीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास रोख ५० हजारांचे बक्षीस देण्यात आले. पोलिस प्रशासनातर्फे केलेल्या गौरवाने अधिकारी व कर्मचारी भारावून गेले.
कणेरी (ता. करवीर) येथील परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठावरील जुन्या निवासस्थानात झालेली चोरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने उघडकीस आणली. याप्रकरणी अट्टल चोरटा लखन कृष्णा माने (वय २२, रा. वंदूर, ता. कागल) याला अटक केली. आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारमध्ये जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उलघडून याप्रकरणी कटाचा सूत्रधार अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. या दोन्हीही घटना संवेदनशील होत्या. पोलिसांना तपास करणे आव्हानात्मक होते; परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावला. गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणल्याने पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी या पथकाचे अभिनंदन करून त्यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव केला. त्यामध्ये गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील, करवीरचे पोलिस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, सहा. पोलिस निरीक्षक विकास जाधव, रमेश खुणे, रवींद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सचिन पंडित, सचिन मिरधे, सुशीलकुमार वंजारे, सहा. फौजदार विजय कोळी, कॉन्स्टेबल एस. एन. खोराटे, वाय. एस. उपराटे, एस. आर. हुंबे, एस. एम. ढवळे, एस. डी. कुंभार, एस. जे. काशीद, पी. बी. संकपाळ, जे. ए. भोसले, पी. एस. माने, ए. व्ही. बंद्रे, एस. एस. पाटील, आर. बी. शिटे आदींचा समावेश आहे. ( प्रतिनिधी)

Web Title: Police Officer, Honor Of Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.