शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरण: राजू पाटील याचा जामीन फेटाळला, दोघांना तात्पुरता जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 13:11 IST

गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात असलेल्या दोन्ही संशयितांना पहिल्यांदाच जामीन मंजूर

कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी अटकेत असलेले संशयित महेश मनोहर फळणीकर (रा. आजरा) आणि निलंबित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर या दोघांना पनवेल जिल्हा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला. तिसरा संशयित राजू पाटील याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.सध्या तळोजा कारागृहात असलेला संशयित महेश फळणीकर याचे वडील मनोहर लक्ष्मण फळणीकर यांचे आजरा येथे निधन झाले. त्यामुळे उत्तरकार्य विधीसाठी सात दिवसांच्या जामिनाची मागणी फळणीकर याच्या वकिलांनी पनवेल जिल्हा न्यायालयात केली होती. मात्र, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी ५ ते ७ एप्रिलदरम्यान तीन दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला. या गुन्ह्यातील प्रमुख संशयित अभय कुरुंदकर याच्या मुलीचे लग्न २४ एप्रिलला कोल्हापुरात आहे. त्या लग्न समारंभास उपस्थित राहता यावे, यासाठी कुरुंदकर याने वकिलामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. त्यालाही २३ ते २५ एप्रिलदरम्यान तात्पुरता जामीन न्यायाधीशांनी मंजूर केला. विविध अटी आणि शर्तींनुसार दोन्ही संशयितांना जामीन मंजूर झाला आहे.

गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात असलेल्या दोन्ही संशयितांना पहिल्यांदाच जामीन मंजूर झाला आहे. या गुन्ह्यातील तिसरा संशयित राजू पाटील यानेही जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायाधीशांनी पाटील याचा अर्ज फेटाळला, अशी माहिती संशयितांच्या वकिलांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAshwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण