पोलीस निरीक्षक, अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: June 2, 2015 01:22 IST2015-06-02T01:22:58+5:302015-06-02T01:22:58+5:30

शिरोळचे जगताप यांची वडगावला, बागल यांची शिरोळला, वडगावचे पाटील गडहिंग्लजला

Police Inspector, Officers Transfer | पोलीस निरीक्षक, अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलीस निरीक्षक, अधिकाऱ्यांच्या बदल्या

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही. बी. जगताप यांची वडगाव, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक वसंत बी. बागल यांची शिरोळ येथे, तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर मोहिते यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी)ला, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात, तसेच वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांची गडहिंग्लजला बदली झाली.
या बदल्यांचे आदेश रविवारी रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी काढले.
दरम्यान, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व २७ पोलीस उपनिरीक्षकांच्या अशा एकूण ३५ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन सहायक निरीक्षकांसह एका महिला सहायक पोलीस निरीक्षक, तीन महिला उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे रमेश एन. खुणे यांना पुन्हा एकदा ‘स्थानिक गुन्हे अन्वेषण’ शाखेला संधी मिळाली. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यातच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात.
या झालेल्या बदल्यांमध्ये पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक (कळे पोलीस ठाण्याचे प्रभारी पदभार) असलेले पी. पी. शेवाळे यांची करवीर, तर शहापूर पोलीस ठाण्याचे जी. एम. देशमुख यांची शहर वाहतूक नियंत्रण शाखेला बदली झाली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वैष्णवी एस. पाटील यांची तक्रार निवारण केंद्र /अ‍ेटीएचयू सेल बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षकामधील २७ बदल्यांपैकी तीन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या : (पोलीस उपनिरीक्षकाचे नाव कोठून, कंसात कोठे या क्रमाने)
आर. एच. गवारी : करवीर, (लक्ष्मीपुरी), गजेंद्र एम. पालवे : करवीर, (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), जे. डी. जाधव : जुना राजवाडा (आजरा), प्रतिभा प्रभाकर ठाकूर : जुना राजवाडा (शिवाजीनगर पोलीस ठाणे ), अमोल बाळू माळी : शाहूपुरी (शिवाजीनगर), राकेश लक्ष्मण डांगे : शाहूपुरी (भुदरगड), डी. बी. तिबिले : पन्हाळा (चंदगड), एस. आर. दिवटे : गडहिंंग्लज (शाहूवाडी), एस. के.काटे : मुरगूड (वाचक करवीर विभाग), एन. जी. घाग : वाचक करवीर (शिरोली एम.आय.डी.सी.), सोमनाथ शिवाजी पांचाळ : लक्ष्मीपुरी (गांधीनगर पोलीस ठाणे), सचिन अशोक पंडित : राजारामपुरी (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), राम गोविंद गोमारे : गांधीनगर (इचलकरंजी पोलीस ठाणे), प्रशांत हणमंतराव यम्मेवार : इचलकरंजी (चंदगड), पद्मराज रामराव गंपले : इचलकरंजी (चंदगड), मीना राजेंद्र मरे इचलकरंजी (जुना राजवाडा पोलीस ठाणे), अमोल सुब्राव तांबे : शिवाजीनगर (मुरगूड), राधिका व्यंकटराव मुंडे : शिवाजीनगर (शाहूपुरी), सचिन भगवानसिंग मिरधे : वडगाव (आजरा), अर्जुन धोंडिबा धनवट : कोडोली (करवीर), संदीप आनंदराव बोरकर : शाहूवाडी (कोडोली), श्रीकांत सुधाकर पाटील : राधानगरी (राजारामपुरी), विष्णू साहेबराव गायकवाड : भुदरगड ( राधानगरी), पंडित कल्याणराव मस्के : मुरगूड (शिवाजीनगर), श्रीराम आनंदराव पडवळ : गडहिंग्लज (शाहूवाडी) संतोष भगवान बडे : आजरा (शाहूपुरी).
 

Web Title: Police Inspector, Officers Transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.