प्रत्येक विसर्जन कुंडावर पोलीस, होमगार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:51+5:302021-09-14T04:29:51+5:30
कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जन आज मंगळवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नदी, तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी प्रतिबंध केले ...

प्रत्येक विसर्जन कुंडावर पोलीस, होमगार्ड
कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जन आज मंगळवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नदी, तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी प्रतिबंध केले आहे, त्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. त्या प्रत्येक विसर्जन कुंडावर पोलीस व होमगार्ड बंदोबस्तासाठी असेल. जिल्ह्यात पाचशेहून अधिक पोलीस तसेच १५०० होमगार्ड आदी सुरक्षा यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज आहे.
आज, मंगळवारी घरगुती गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर शहरात चौकाचौकांत सुमारे ११२ ठिकाणी महापालिकेच्या वतीने १५८ विसर्जन कुंड निर्माण केली आहेत. प्रत्येक विसर्जन कुंडावर पोलीस बंदोबस्त असेल. विशेषता; पंचगंगा नदी तसेच रंकाळा, कोटीतीर्थ तलावासह इतर तलावातही गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशमूर्ती दान ही संकल्पनाही प्रतिवर्षाप्रमाणे राबवण्यात आली आहे, त्यालाही प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहर, इचलकरंजीसह संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ३० पोलीस अधिकारी संपूर्ण बंदोबस्तावर लक्ष ठेवून राहणार आहे.
आजचा पोलीस बंदोबस्त असा :
पोलीस अधिकारी : ३०
पोलीस कर्मचारी : ४९०
होमगार्ड : १५००
इतर सुरक्षा तुकड्या : १२