पोलिसांच्या हेल्पलाईनवर नागरिकांसह खबऱ्यांचे फोन
By Admin | Updated: March 8, 2015 00:27 IST2015-03-08T00:20:44+5:302015-03-08T00:27:11+5:30
पानसरे हत्याप्रकरणी तपासाला सहकार्य

पोलिसांच्या हेल्पलाईनवर नागरिकांसह खबऱ्यांचे फोन
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास शासनाकडून २५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. या हत्येसंदर्भात काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावी, असे आवाहन केले होते. त्यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यावर शंभरपेक्षा जास्त नागरिक व खबऱ्यांनी पानसरे हत्येसंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा पोलिसांकडून केली जात असून, त्याबाबत पूर्णत: गोपनीयता पाळली आहे.
मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास शासनाकडून २५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. त्यासाठी मोबाईल क्र. ९७६४००२२७४ व ०२३१-२६५४१३३ या नंबरची विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यावर माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.