फुलेवाडी रिंगरोडवरील खूनप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST2021-01-09T04:20:28+5:302021-01-09T04:20:28+5:30
फुलेवाडी रिंगरोडवरील क्रांतिसिंह नाना पाटील नगरानजीक वासुदेव काॅलनीत राहणाऱ्या कचरे व फोंडे कुटुंबांत जेवणातील शिल्लक पदार्थ घरासमोरील गटारात ...

फुलेवाडी रिंगरोडवरील खूनप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी
फुलेवाडी रिंगरोडवरील क्रांतिसिंह नाना पाटील नगरानजीक वासुदेव काॅलनीत राहणाऱ्या कचरे व फोंडे कुटुंबांत जेवणातील शिल्लक पदार्थ घरासमोरील गटारात टाकण्याच्या कारणावरून काही महिने वाद होता. बुधवारी (दि. ६) रात्री उशिरा कचरे व फोंडे कुटुंबांत पुन्हा वाद उफाळला. दत्ता फोंडे याने आकाश वांजोळेला फोन करून बोलावून घेतले. यावेळी कचरे कुटुंबातील संशयित हातात शस्त्रे घेऊन उभी होती. त्यावेळी पुन्हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे फोंडे याच्यावर हल्ला केला. या दरम्यान आकाश वांजोळेच्या मानेवर संशयितांनी वार केले. वार वर्मी लागल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी अटकेत असलेल्या मारुती कचरे, भारत कचरे, सुरेश कचरे या तिघा संशयितांना शुक्रवारी करवीर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने या तिघा संशयितांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.