पोलीस हवालदाराचा कर्तव्यावर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:46+5:302021-01-08T05:23:46+5:30

गारगोटी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महादेव लक्ष्‍मण आबिटकर (वय ५७) यांचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...

Police constable dies on duty | पोलीस हवालदाराचा कर्तव्यावर मृत्यू

पोलीस हवालदाराचा कर्तव्यावर मृत्यू

गारगोटी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महादेव लक्ष्‍मण आबिटकर (वय ५७) यांचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी कर्तव्यावर हजर झाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर पोलीस दलात त्यांची भरती झाली होती. सकाळी ड्यूटी असल्याने ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे आल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार आबिटकर आपल्या शांत व मनमिळाऊ स्वभावामुळे पोलीस ठाण्यात सर्वाना प्रिय होते. त्यांचे पार्थिव पोलीस ठाण्यासमोर येताच सहकारी तसेच महिला कर्मचारी धाय मोकलून रडत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे

क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस दलातील कर्मचारी त्याचबरोबर गारगोटी गावभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा क्रांती चौकात गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे पोलीस निरीक्षक उदय डुबल, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, आदींनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. गारगोटी वैकुंठधाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्या, शुक्रवारी सकाळी रक्षाविसर्जन आहे.

) फोटो: महादेव आबिटकर

Web Title: Police constable dies on duty