पोलिसांनी पाठलाग करून मोबाईल चारट्यास पकडले

By Admin | Updated: May 18, 2014 00:53 IST2014-05-18T00:49:17+5:302014-05-18T00:53:52+5:30

कोल्हापूर : देवदर्शन घेत असताना भक्ताचा मोबाईल चोरून नेणार्‍या तरुणाला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याची घटना आज,

Police chased and got mobile identity | पोलिसांनी पाठलाग करून मोबाईल चारट्यास पकडले

पोलिसांनी पाठलाग करून मोबाईल चारट्यास पकडले

कोल्हापूर : देवदर्शन घेत असताना भक्ताचा मोबाईल चोरून नेणार्‍या तरुणाला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याची घटना आज, शनिवार राजारामपुरी परिसरात घडली. संतोष चंद्रसेन मुदगल (वय २०, रा. चंद्रानगर निपाणी) असे संशयित मोबाईल चोरट्याचे नाव असून, राजारामपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, राजारामपुरी १२व्या गल्लीत मारुती मंदिर आहे. सकाळी मंदिराबाहेर भक्त नमस्कार करून देवदर्शन घेत होता. त्यावेळी संशयित संतोष मुदगल याने त्या भक्ताच्या खिशातील मोबाईल चोरला. तेव्हा भक्ताने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे वाहतूक शाखेचे पोलीस संजीव कराड, एस. आर. चाचे, सुहास संकपाळ व चंद्रकांत कोरडे हे चौघे थांबले होते. चोरीचा प्रकार समजताच अवघ्या पाच मिनिटांतच पोलिसांनी मोबाईल चोरट्याचा पाठलाग करून पकडले. यानंतर मोबाईल चोरट्यास राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Police chased and got mobile identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.