पोलीस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST2021-02-16T04:25:36+5:302021-02-16T04:25:36+5:30

काही दिवसांपूर्वी खात्यातील एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाने रात्रीच्या वेळेस बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पंपावरील कर्मचाऱ्याचा गळा दाबून ढकलून ...

Police beat up employees at petrol pumps | पोलीस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

पोलीस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

काही दिवसांपूर्वी खात्यातील एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाने रात्रीच्या वेळेस बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पंपावरील कर्मचाऱ्याचा गळा दाबून ढकलून दिल्याने त्या कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली. दुसऱ्या दिवशी पंपावरील अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याला बोलावून फक्त समज देऊन सोडून दिले.

रविवारी रात्री एका पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आपल्या मुलाबरोबर पेट्रोल टाकण्यासाठी आली असता, पेट्रोल टाकण्यावरून कर्मचाऱ्यांबरोबर वादावादी झाली. यावेळेस त्या महिलेने वाद घातल्याने कर्मचाऱ्याने मुलाच्या गाडीची चावी काढून घेतली. परिणामी, कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत संबंधीत महिलेने आपल्या पोलीस पतीला बोलावले. संबंधित पोलिसाने पेट्रेाल पंपावर येत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांकडूनच मारहाण केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Police beat up employees at petrol pumps