मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन सज्ज
By Admin | Updated: October 19, 2014 00:44 IST2014-10-19T00:44:10+5:302014-10-19T00:44:31+5:30
मनोजकुमार शर्मा : १२९ संवेदनशील गावांत सशस्त्र बंदोबस्त

मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन सज्ज
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यातील १२९ संवेदनशील गावांमध्ये कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनसह तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गांत बदल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली.
रविवार (दि. १९) पहाटे पाचपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरात वाहनांना प्रवेश बंदी असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बंदोबस्त
पोलीस अधीक्षक : १
अप्पर पोलीस अधीक्षक : ३
उपअधीक्षक : ६, पोलीस निरीक्षक : २०
सहायक पोलीस निरीक्षक : १५
पोलीस उपनिरीक्षक : ४०
पोलीस : २६००, होमगार्ड : ७००
केंद्रीय सुरक्षा दलाची १००
जवानांची कंपनी : २
पार्किंग व्यवस्था
कार्यकर्त्यांची वाहने राजाराम तलाव, शिवाजी विद्यापीठ गेट क्र. ६ च्या मागील बाजूस, टेंबलाई मंदिर परिसर, आदी ठिकाणी ट्रक, टेम्पो, कार, मोटारसायकलींसाठी पार्किंगची सोय केली आहे; तर शासकीय वाहनांची पार्किंग व्यवस्था राजाराम कॉलेज व शासकीय तंत्रनिकेतन परिसरात करण्यात आली आहे.
वाहतुकीस बंद करण्यात येणारे मार्ग
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सायबर चौक ते सरनोबतवाडी नाका, कोयास्को चौक (रेल्वे फाटक उड्डाणपूल) ते हायवे कॅँटीन चौक हा मार्ग बंद राहील.