पोलीस प्रशासन ‘मृत्युंजय’कारांच्या स्मृती जपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:08+5:302021-09-19T04:24:08+5:30

कोल्हापूर : मराठीतील लोकप्रिय ‘मृत्युंजय’ कादंबरी लक्ष्मीपुरीच्या पोलीस वसाहतीमध्ये लिहिली गेली याचा आम्हांला अभिमान आहे. जरी ही वसाहत ...

The police administration will remember Mrityunjay's car | पोलीस प्रशासन ‘मृत्युंजय’कारांच्या स्मृती जपेल

पोलीस प्रशासन ‘मृत्युंजय’कारांच्या स्मृती जपेल

कोल्हापूर : मराठीतील लोकप्रिय ‘मृत्युंजय’ कादंबरी लक्ष्मीपुरीच्या पोलीस वसाहतीमध्ये लिहिली गेली याचा आम्हांला अभिमान आहे. जरी ही वसाहत नव्या स्वरूपामध्ये उभारली जाणार असली तरीही या ठिकाणी ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती पोलीस प्रशासन जपेल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

सावंत यांच्या स्मृतिदिनी शनिवारी सकाळी लक्ष्मीपुरीतील पोलीस वसाहतीतील ज्या खोलीमध्ये ही कादंबरी लिहिली त्याच ठिकाणी बलकवडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. निर्धार प्रतिष्ठान, अक्षर दालन आणि मृत्युंजय प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.

संजयसिंह चव्हाण म्हणाले, सावंत यांच्या सहवासामध्ये काही वेळ व्यतीत करण्याची मला संधी मिळाली होती. या कादंबरीमुळे भारावलेल्या पिढीचे आम्ही प्रतिनिधी आहोत. सु.रा. देशपांडे यांनीही कला, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये भरीव काम करून ठेवले आहे, याचा मी साक्षीदार आहे.

सावंत यांच्या आठवणींना उजाळा देत निर्धारने अनेकांच्या सहकार्यातून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा समीर देशपांडे यांनी घेतला. रवींद्र जोशी आणि प्राचार्य जाॅन डिसोझा यांनी स्वागत केले. कार्यक्रमास राम देशपांडे, कृष्णा दिवटे, युवराज कदम, डाॅ. कविता गगराणी, अमेय जोशी, सुरेश मिरजकर, नारायण बेहेरे, चंद्रकांत सावंत यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.

चौकट

माझ्या करिअरसाठी ‘मृत्युंजय’ ठरली प्रेरक

बलकवडे म्हणाले, माझे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले. मी अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आणि झालो पोलीस अधिकारी; परंतु माझ्या यूपीएससीच्या आधी मी मृत्युंजय वाचली. त्या काळात माझ्या मनाची द्विधावस्था संपवण्याचे काम या कादंबरीने केले. माझ्या करिअरसाठी ही कादंबरी मला प्रेरक ठरली.

१८०९२०२१ कोल शिवाजीराव सावंत

कोल्हापुरात लक्ष्मीपुरी वसाहतीमध्ये ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेचे शैलश बलकवडे आणि संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी डावीकडून डॉ. कविता गगराणी, रवींद्र जोशी, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, राम देशपांडे उपस्थित होते.

Web Title: The police administration will remember Mrityunjay's car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.