कुर परिसरात पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:52+5:302021-05-20T04:24:52+5:30
भुदरगड तालुक्यातील कुर दारवाड परिसरात मंगळवार (दि. १८ ) रस्त्यावर विनाकरण फिरणाऱ्या वाहन चालक, पादचारी यांच्यावर गारगोटी पोलिसानी दंडात्मक ...

कुर परिसरात पोलिसांची कारवाई
भुदरगड तालुक्यातील कुर दारवाड परिसरात मंगळवार (दि. १८ ) रस्त्यावर विनाकरण फिरणाऱ्या वाहन चालक, पादचारी यांच्यावर गारगोटी पोलिसानी दंडात्मक कारवाई सुरू करताच गर्दी ओसरली. प्रशासनाच्या आदेशानुसार १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत, २ वाहने जप्त करण्यात आली .
गारगोटी पोलिसांनी लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिसही नागरिकांची काळजी घेताना दिसत आहेत. कारवाई करतेवेळी पोलिस आणि वाहनचालक यांच्यात प्रसंगी वादविवाद घडत होते, मात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले पण जे ऐकत नव्हते त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारून कायद्याचे पालन केले.