इचलकरंजीत १४० जणांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST2021-05-19T04:25:23+5:302021-05-19T04:25:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : लॉकडाऊन काळातही मॉर्निंग वॉक, विनामास्क व विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या नागरिकांवर लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशीही पोलिसांनी ...

इचलकरंजीत १४० जणांवर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : लॉकडाऊन काळातही मॉर्निंग वॉक, विनामास्क व विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या नागरिकांवर लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशीही पोलिसांनी कडक कारवाई केली. यामध्ये तिन्ही पोलीस ठाण्याने एकूण १४० जणांवर कारवाई केली, तर गावभाग पोलीस ठाण्यात ८४ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली असून, तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहर व परिसरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करत फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत कारवाईला सुरुवात केली. सलग तिसऱ्या दिवशी कडक कारवाई करत गावभाग ८४, शिवाजीनगर ३१ व शहापूर २५ अशा एकूण १४० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. गावभाग पोलिसांनी ८४ जणांची अँटिजन चाचणी केली. यामध्ये तीनजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह रुग्णांना मुसळे हायस्कूल येथील विलगीकरण कक्षात पाठवले आहे.
फोटो ओळी
१८०५२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली.
छाया-उत्तम पाटील