शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

PM Kisan चे आणखी ४३०० खातेदार अपात्र, दुसऱ्या हप्त्याला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 11:00 IST

PM Kisan Scheme : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पी. एम. किसान’ योजना सुरू केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी होत्या. वास्तविक खातेदार शेतकऱ्यांनाच पेन्शन योजनेचा लाभ देणे अपेक्षित होते.

- राजाराम लोंढे

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ योजनेतील लाभार्थ्यांची कसून चौकशी महसूल यंत्रणेकडून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १६ हजार खातेदार अपात्र ठरले होते. या चौकशीत आणखी ४ हजार ३०० खातेदार अपात्र ठरले आहेत. संपूर्ण खात्यांची चौकशी करून १० जूनपर्यंत केंद्र सरकारकडे अहवाल पाठवायचा असल्याने यंत्रणा गतिमान झाली आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘पी. एम. किसान’ योजना सुरू केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक त्रुटी होत्या. वास्तविक खातेदार शेतकऱ्यांनाच पेन्शन योजनेचा लाभ देणे अपेक्षित होते. त्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर सोपविणे गरजेचे होते. मात्र, महा ई-सेवा केंद्रांसह इतरांनी शेतकऱ्यांची माहिती भरल्याने मोठ्या प्रमाणात बोगस शेतकरी यादीत आले. याबाबत तक्रारी झाल्यानंतर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गेले वर्षभर त्याची चौकशी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार खातेदार अपात्र ठरले. यामध्ये आयकर परतावा करणारे, सरकारी नोकरी असणाऱ्यांचा अधिक प्रमाणात समावेश होता. त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

अपात्र खातेदारांची सखोल चौकशी सुरू असून, आणखी चार हजार ३०० खातेदार अपात्र ठरले आहेत. आठ हजार खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना आधार लिंक करण्याची सक्ती केली आहे. येत्या महिनाभरात चौकशी पूर्ण करून अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. अपात्र खातेदारांना नोटीस काढून लाभाची रक्कम परत करण्यासाठी विहित कालावधी द्यावा, त्या कालावधीत पैसे परत केले नाही, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना आहे.

आणेवारी असणारे अपात्र ठरणारज्यांच्या नावावर जमीन आहे, तेच पात्र ठरणार असून, आणेवारीत असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सध्या लाभ घेत असलेल्यांमध्ये आणेवारीतील शेतकऱ्यांची संख्या कमी नाही.

चौकशीसाठी चाळण...पी. एम. किसान योजनेतील बोगसगिरीची थेट संसदेत चर्चा झाली होती. त्यामुळे लाभार्थ्यांच्या चौकशीसाठी महसूल यंत्रणेने अक्षरश: चाळण लावली आहे. लाभ घेतलेल्या बोगस खातेदारांकडून रक्कम तातडीने वसुली करा, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. जे अधिकारी वसूल करणार नाहीत, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची तयारी केंद्र सरकारने केल्याने संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दुसऱ्या हप्त्याला विलंबसाधारणत: मे महिन्याच्या १ किंवा २ तारखेला पी. एम. किसानचा दुसरा हप्ता येतो. चौकशी सुरू आहे, त्यात एकाही अपात्र खातेदाराच्या नावावर पैसे जमा होणार नाहीत, याची दक्षता महसूल यंत्रणेने घेतली आहे. त्यामुळे हप्ता वर्ग होण्यास आणखी दहा दिवसांचा विलंब लागणार असल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना