रेडझोन परिसरात फलक लावा; घरे बांधणाऱ्यांची फसवणूक टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 05:44 PM2019-11-27T17:44:19+5:302019-11-27T17:45:58+5:30

कोल्हा पूर : निश्चित केलेल्या रेडझोनचे जाहीर सादरीकरण करण्याची मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात ...

Plaque in the Redzone area | रेडझोन परिसरात फलक लावा; घरे बांधणाऱ्यांची फसवणूक टाळा

रेडझोन परिसरात फलक लावा; घरे बांधणाऱ्यांची फसवणूक टाळा

Next
ठळक मुद्दे शहर व जिल्हा नागरी कृती समिती; निश्चित केलेल्या रेडझोनचे सादरीकरण करण्याची मागणी

कोल्हापूर : निश्चित केलेल्या रेडझोनचे जाहीर सादरीकरण करण्याची मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. ज्या परिसरात रेडझोन आहे, तेथे फलक लावण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली.

 आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोल्हापुरात महापूर आला. यावेळी शहरात पाणी घुसण्याचे प्रमुख कारण म्हणजे रेडझोन परिसरात भराव टाकून केलेली बांधकामे आहेत. रेडझोन परिसरातील बांधकामाबाबत आॅगस्टमध्ये निवेदन देऊन ३0 सप्टेंबरपर्यंत रेडझोन निश्चित करण्याची मागणी केली होती. याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची समजते; त्यामुळे एखाद्या हॉलमध्ये निश्चित केलेल्या रेडझोनचे सादरीकरण करण्यात यावे. सध्या रेडझोन परिसरात भराव टाकून बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. विवेक घाटगे, माजी नगरसेवक विजय साळोखे-सरदार, संभाजी जगदाळे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, माणिक मंडलिक, सुभाष देसाई, दिलीप पोवार, नामदेव गावडे, लालासो गायकवाड यांनी केला आहे.

  • घरे बांधणाऱ्यांची फसवणूक टाळा

घर खरेदीसाठी अथवा बांधण्यासाठी खर्च केली जाते. यानंतर त्यांना कळून चुकते की घराचा परिसर हा रेडझोन मधील आहे. मालमत्ता पाण्यात बुडाली असून, आपली चूक झाली हे वेळ गेल्यानंतर समजते, असे प्रकार येथून पुढे होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी रेडझोन निश्चित केले आहेत. त्या ठिकाणी रेडझोन परिसर असल्याचे फलक लावण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
---------------------------------------------------

Web Title: Plaque in the Redzone area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.