महे येथे ७ हजार ७७७ वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST2021-07-02T04:16:57+5:302021-07-02T04:16:57+5:30
सावरवाडी : कृषीदिनाचे औचित्य साधून महे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सात ...

महे येथे ७ हजार ७७७ वृक्षांची लागवड
सावरवाडी : कृषीदिनाचे औचित्य साधून महे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सात हेक्टर गायरान जमिनीमध्ये ७ हजार ७७७ इतकी वृक्षांची लागवड करण्यात आली.
गावच्या पूर्व दिशेला असलेल्या ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरातील गायरान जमिनीमध्ये वृक्षारोपण उपक्रम राबविल्यामुळे या परिसराचे सौंदर्यामध्ये भर पडणार आहे.
या वेळी सरपंच सज्जन पाटील, उपसरपंच रूपाली बोराटे, एस. डी. जरग, पांडुरंग पाटील, सचिन पाटील, बाजीराव जरग, पोलीस पाटील इंदूबाई हुजरे, माजी सरपंच सर्जेराव हुजरे, सचिन पाटील, दत्ता शिंदे, वनरक्षक आनंदा बरगे यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते.