पानसरेंच्या रक्षेत वृक्षारोपण
By Admin | Updated: February 25, 2015 00:38 IST2015-02-25T00:33:23+5:302015-02-25T00:38:37+5:30
अब मैं विचार हूँ़़़़़: सीबीएस परिसरात कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेतर्फे उपक्रम

पानसरेंच्या रक्षेत वृक्षारोपण
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेतर्फे मंगळवारी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या रक्षेमध्ये स्मिता पानसरे-सातपुते यांच्या हस्ते वडाचे रोप लावण्यात आले़ ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या विचारांचा झरा अखंडित राहावा व त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांची रक्षा कार्यकर्त्यांना वृक्षारोपणासाठी देण्याचा संकल्प भाकपच्या २२ व्या अधिवेशनात करण्यात आला होता़ यावेळी स्मिता सातपुते म्हणाल्या, आपल्याला आता पानसरेंचे काम जोमाने करावे लागणार आहे़ त्यासाठी या आंदोलनात नाही रे वर्गाला सोबत घेतले पाहिजे़ स्थायी समितीचे सभापती आदिल फरास म्हणाले, पानसरेंचा खून धर्मांध शक्तींनी केला आहे़ धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी पक्षीय मतभेद विसरून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे़ पानसरे अण्णा परिवर्तन आधारवड जतन करण्याची जबाबदारी मी घेत आहे़ सतीश कांबळे म्हणाले, पानसरेंच्या विचारांचा झंझावात कायमस्वरूपी ठेवण्यासाठी पानसरे अण्णा आधारवड आम्हाला प्रेरणा देईल़ या रोपट्याचे पालकत्व खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले आहे़ पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासनही महाडिक यांनी दिले आहे़ यावेळी माजी महापौर शिवाजी कदम, भाकपचे जिल्हा सचिव एस़ बी़ पाटील, माजी नगरसेविका मनीषा बुचडे, रघुनाथ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी नामदेव गावडे, अनिल चव्हाण, मिलिंद यादव, दिलदार मुजावर, गिरीश फोंडे, इम्तियाज हकीम, बाबा बुचडे, अरुण देवकुळे, सलिम जमादार, बी़ एल़ बर्गे, शिवाजी माळी, उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
‘स्वातंत्र्यसैनिक कॉ़ पानसरे अण्णा परिवर्तन आधारवड’
कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या रक्षेमध्ये स्मिता पानसरे-सातपुते यांच्या हस्ते वडाचे रोप लावण्यात आले़ या रोपट्याचे नामकरण ‘स्वातंत्र्यसैनिक कॉ़ पानसरे अण्णा परिवर्तन आधारवड’, असे करण्यात आले आहे़
यावेळी शिवाजी माळी, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, शिवाजी कदम, आदिल फ रास, बी. एल. बरगे, अनिल चव्हाण, आदी उपस्थित होते़