बार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:41+5:302021-06-19T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू असलेल्या वृक्षारोपण पंधरवडाअंतर्गत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ...

बार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू असलेल्या वृक्षारोपण पंधरवडाअंतर्गत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व समाजकल्याण विभाग यांच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, भूसंपादन उपजिल्हाधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते करंज,जंगली भेंडी,कॅशिया, आपटा, सिल्वर ओक या प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात,तहसीलदार संतोष कणसे,तहसीलदार अनंत गुरव,महसूल सहायक गजानन कुरणे,अव्वल कारकून अनुराधा सोनवणे, समतादूत प्रतिभा सावंत,आशा रावण उपस्थित होत्या.
यासह करवीर पंचायत समिती येथेही गटविकास अधिकारी जयवंत उगले,जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महासंचालक धम्मज्योति गजभिये यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी बार्टी योजना प्रमुख मेघराज भाते यांचे मार्गदर्शन लाभले.
---
फोटो कोलडेस्क ला वृक्षारोपण नावाने save केला आहे.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी समाजकल्याण विभाग यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.