आवळे यांच्या वाढदिनी सूतगिरणी कार्यस्थळावर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:40+5:302021-07-07T04:30:40+5:30
हातकणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी व्यापक विकासाची चळवळ गतिमान केली. सूतगिरणीची उभारणी करून हजारो ...

आवळे यांच्या वाढदिनी सूतगिरणी कार्यस्थळावर वृक्षारोपण
हातकणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी व्यापक विकासाची चळवळ गतिमान केली. सूतगिरणीची उभारणी करून हजारो युवकांना रोजगार मिळवून दिला. राज्यात सूतगिरणीचा नावलौकिक वाढून ती प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. त्यांचे कर्तृत्व दमदार आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आमदार राजू आवळे जोमाने पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन सूतगिरणीचे अकाउंट मॅनेजर संजय चौगुले यांनी वृक्षारोपण कार्यकमाप्रसंगी केले.
वडगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, बाजार समिती सभापती चेतन चव्हाण, जनसंपर्क अधिकारी रमेश पाटोळे, लेबर ऑफिसर गजानन कांबळे, सेल्स इनचार्ज गुंडा नरबळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी रावसाहेब माने, सुमंत वडेर, शाखा अभियंता एल. एस. मिसाळ, अविनाश चौगुले, जावेद कुरणे, रणजित निकम, राहुल माने, उदय पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी-माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले सूतगिरणी कार्यस्थळावर सचिन चव्हाण, संजय चौगुले, रमेश पाटोळे, चेतन चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी गजानन कांबळे, गुंडा नरबळ, जावेद कुरणे, उदय पाटील, राहुल माने उपस्थित होते.