शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उपद्रवग्रस्त टस्कर न्या.., मठाचा हत्ती वनतारात कशाला नेता - सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:57 IST

शेतकऱ्यांचे नुकसान करणारे हत्ती पकडून घेऊन जावा

कोल्हापूर : नांदणी, करवीर, तेरदाळ येथील स्वस्तिश्री जनिसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाचा हत्ती गुजरातच्या वनतारा या ठिकाणी घेऊन जाण्याचे नियोजन सरकार करीत आहे. तुम्हाला हत्तीच न्यायचे असतील तर शेतकऱ्यांचे नुकसान करणारे हत्ती पकडून घेऊन जावा, पण जैन मठामधील हत्ती नेऊ नका, अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केली. नांदणी येथील मठाने हा हत्ती येथून हलवू नये यासाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली.सतेज पाटील म्हणाले, जैन मठातील हत्तींची निगा कशी राखावी याबाबत सरकारने नियमावली तयार करावी. हा हत्ती नेण्यामुळे धार्मिक भावना दुखाविण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा. दोनशे वर्षांची परंपरा सरकार मोडणार आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोणतीही कार्यवाही होऊ नये यासाठी प्रयत्न करा : मठाची मागणीजैन मठातील माधुरी हत्ती जामनगरला हस्तांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नांदणी, करवीर, तेरदाळ येथील स्वस्तिश्री जनिसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ अतिशय प्राचीन धर्मपीठ आहे. हत्ती घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू झाल्याने सामाजिक व धार्मिक असंतोष निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल रिटपिटिशन आदेश होईपर्यंत हत्ती स्थलांतराबाबत कोणतीही कार्यवाही होऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मठाने आमदार सतेज पाटील यांच्याकडे केली.