शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

Kolhapur: नरेंद्र मोदींच्या आसपास, प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट हमखास

By समीर देशपांडे | Updated: April 27, 2024 12:22 IST

मोदी यांच्या सभेविषयी उत्सुकता, हेलिपॅडचा निर्णय रद्द

समीर देशपांडेकोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या कोल्हापूर दौऱ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जवळपास जाता येणार आहे. त्यासाठी पूर्ण अभ्यास करून संबंधितांची यादी तयार करण्यात आली असून त्यातूनही रूसवे, फुगवे होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जात आहेत. मोदी हे कर्नाटकातून शनिवारी संध्याकाळी कोल्हापूर विमानतळावर येणार असून तेथून ते तपोवन मैदानावर येणार आहेत.मोदी यांच्या या सभेविषयी उत्सुकता असून त्याची प्रशासकीय पातळीवरही जोरदार तयारी सुरू आहे. दिल्ली, मुंबई आणि पुण्याहून अधिकारीही येथे दाखल झाले आहेत. सध्या तपोवनवर सभेसाठीच्या मंडपाची युद्धपातळीवर उभारणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात दाखल झालेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी सात जणांची समिती तयार केली आहे. यामध्ये भाजपचे राज्य सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, युवासेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास यांचा समावेश आहे.या सर्वांनी बसून तीन टप्प्यामध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मोदी यांना कसे भेटवता येईल, याचे नियोजन केले आहे. त्यानुसार १५ मान्यवर विमानतळावर त्यांचे स्वागत करतील. १५ जण त्यांचे ‘तपोवन’वर व्यासपीठाजवळ स्वागत करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रीगण वगळता ४० जण मंचावर असतील. पुन्हा जाताना मंचाशेजारी त्यांना निरोप देण्यासाठी वेगळे १५ तर विमानतळावर निरोप देण्यासाठी वेगळे १५ पदाधिकारी असतील. या माध्यमातून सर्वांना मोदी यांना जवळून भेटता यावे, असे नियोजन करण्यात आले आहे.

हेलिपॅडचा निर्णय रद्दसुरुवातीला पंतप्रधान मोदी हे कोल्हापूर विमानतळावरून तपोवनवर हेलिकॉप्टरने येणार होते. त्यानुसार त्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याच्या सूचनाही बुधवारी देण्यात आल्या होत्या. परंतु आता त्यात बदल झाला असून मोदी हे रस्त्याने ‘तपोवन‘वर येणार आहेत. हे अंतर ११ किलोमीटर आहे. त्यामुळे हेलिपॅडचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी