शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन  : जयंत पाटील : ३१ तारखेला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 20:05 IST

Jayant Patil Kolhapur flood meeting : कृष्णा खोऱ्यात गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोल्हापूर, सांगली परिसरात महापुराचा धोका होऊ नये यासाठी राज्य शासन कर्नाटकशी संपर्क ठेवून आहे. धरणांची उंची, सोडलेले पाणी याचे तारत्मय ठेवून पाण्याचे नियोजन केले जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी दिली. याबाबत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देकर्नाटकच्या समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन  : जयंत पाटील विभागातील अधिकाऱ्यांची ३१ तारखेला झूम बैठक

कोल्हापूर : कृष्णा खोऱ्यात गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोल्हापूर, सांगली परिसरात महापुराचा धोका होऊ नये यासाठी राज्य शासन कर्नाटकशी संपर्क ठेवून आहे. धरणांची उंची, सोडलेले पाणी याचे तारत्मय ठेवून पाण्याचे नियोजन केले जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी दिली. याबाबत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.कोल्हापूर-सांगलीला २०१९ मध्ये महापुराचा फटका बसला होता. गेल्या वर्षीदेखील काही प्रमाणात नुकसान झाले. यंदादेखील पाऊस चांगला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा महापुरासारखी परिस्थिती येऊ नये यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे याबाबत त्यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, याच महिन्यात कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात मुख्य सचिव स्तरावर बैठक झाली आहे. त्यांनी कर्नाटकशी संपर्क ठेवला आहे. दोन्ही राज्यांच्या चर्चेतून व समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन केले जाईल.या विषयावर ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार आहे. यावेळी मांडल्या जाणाऱ्या सूचना अमलात आणल्या जातील.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkolhapurकोल्हापूरSangliसांगलीfloodपूर