जिल्ह्याचा साडेसहा हजार कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा
By Admin | Updated: December 16, 2014 00:41 IST2014-12-16T00:28:02+5:302014-12-16T00:41:24+5:30
विकासाचे नियोजन : कृषी व्यवसायाला प्राधान्य

जिल्ह्याचा साडेसहा हजार कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा
कोल्हापूर : जिल्ह्याचा सन २०१५-१६ साठी ६ हजार ६३८ कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास अधिकारी सहायक महाप्र्रबंधक अशोक कांबळे यांनी जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीत सादर केला. आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन या योजनेतर्गंत कृषी पदवीधारकांना प्रशिक्षणासाठी व कृषी उद्योगासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३६ टक्के तर मागासवर्गीय व भटक्या जातीसाठी ४४ टक्के अनुदान दिले जाणार आहे. सर्व योजना जिल्ह्यातील मध्यवर्ती बँक शाखा, राष्ट्रीयीकृत, सहकारी, व्यापारी बँकांतर्फे राबवण्यात येणार आहे. विकासात या आराखड्याला अतिशय महत्त्व आहे.
बैठकीस रिझर्व्ह बँकेचे साहायक महाप्रबंधक व्ही. राजेंद्रन, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
संभावित आराखड्यातील तरतूद (कोटींमध्ये)
पीक कर्ज - २६१६, दीर्घ मध्यम व लघु सिंचन प्रकल्प - ४९३, जमीन सुधारणा - ५५, यांत्रिकिकरण -२९२, फळबाग व रेशीम उद्योग - ६९, वनीकरण व पडिक जमीन सुधारणा - १५, दुग्ध व्यवसाय - ४१३, कुक्कुटपालन - २७, शेळीमेंढी पालन - ४०, मत्स्य व्यवसाय - ४, ग्रामीण गोदामे, शीतगृह, मार्केटिंग सुविधा - १९३, कृषी व्यवसाय मार्गदर्शन - १२, सौरऊर्जा - २६, लघु, मध्यम उद्योगधंदे - ११३१, गृहकर्ज, सेवा सुविधा