कोल्हापूर : महापुराच्या संकटानंतर सामाजिक भान राखत आरे (ता. करवीर) गावाने आता चक्क बॅनर लावून मदत पुरे झाल्याचे आवाहन केले आहे.आरे गावाला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मदत आली. ग्रामस्थांना त्याचे वाटपही चांगल्या पद्धतीने झाल्याने आता यापुढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपातील मदत पाठवू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तशा आशयाचा फलकच गावात शीर्षभागी लावण्यात आला आहे. ज्या गावांना अजूनही मदत मिळालेली नाही, त्यांना ही मदत पाठवली जावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.आरे येथील पूरग्रस्तांसाठी येणारे धान्य, कपडे, बेकरी उत्पादने व विविध किराणा वस्तू, नाशवंत उत्पादने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. तरी आपण आणलेल्या वस्तू इतर पूरग्रस्त गावांसाठी देण्यात याव्यात, असे आवाहनही गावातील समन्वय समितीने घेतला आहे.चारा आणि पशुखाद्यासोबत आर्थिक मदतीची गरजसमितीने जनावरांचा वाळलेला चारा आणि पशुखाद्य तसेच पडलेली घरे उभी करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचेही आवाहन केले आहे. यासाठी बँक आॅफ इंडियाच्या सडोली खालसा शाखेचा क्रमांक दिला आहे.पूरग्रस्तांना मदत वाटप समन्वयासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्वपक्षीय समितीने हा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतलेला आहे. गावातील सुमारे ३२ घरांची पडझड झाली आहे. शेती सेवा केंद्र व अन्य दुकानांंचे नुकसानही जास्त झाले आहे. त्यांना उभे करण्यासाठी कोण संस्था, दानशूर व्यक्ती आर्थिक स्वरूपातील मदत करणार असतील, तर ती अवश्य करावी, त्याचीच आता फार गरज आहे, असे आवाहन गावाच्या वतीने करण्यात आले आहे.
फलक लावून म्हणतेय आरे, गावाला मदत झाली पुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 15:43 IST
महापुराच्या संकटानंतर सामाजिक भान राखत आरे (ता. करवीर) गावाने आता चक्क बॅनर लावून मदत पुरे झाल्याचे आवाहन केले आहे.
फलक लावून म्हणतेय आरे, गावाला मदत झाली पुरे
ठळक मुद्देफलक लावून म्हणतेय आरे, गावाला मदत झाली पुरेचारा आणि पशुखाद्यासोबत आर्थिक मदतीची गरज