डीकेटीईच्या नऊ विद्यार्थ्यांची दक्षिण आफिक्रेतील कंपनीत प्लेसमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:53+5:302021-01-08T05:18:53+5:30

सीजीएम गुरप ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापूस वितरक असून, दक्षिण खंडातील सर्वांत मोठा डेनिम उत्पादक आहे. कंपनीमध्ये कटिंग आणि शिवणकामाबरोबरच ...

Placement of nine DKTE students in a company in South Africa | डीकेटीईच्या नऊ विद्यार्थ्यांची दक्षिण आफिक्रेतील कंपनीत प्लेसमेंट

डीकेटीईच्या नऊ विद्यार्थ्यांची दक्षिण आफिक्रेतील कंपनीत प्लेसमेंट

सीजीएम गुरप ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापूस वितरक असून, दक्षिण खंडातील सर्वांत मोठा डेनिम उत्पादक आहे. कंपनीमध्ये कटिंग आणि शिवणकामाबरोबरच वेट आणि ड्राय प्रोसेसिंग, एम्ब्रॉयडरी, वेस्ट वॉटर प्रक्रिया, रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट फॅसिलिटीची सुविधा आहे.

प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रेयांश दिलीपकुमार रांका, सम्मेद विजय बिरजे, प्रेमकुमार प्रकाश साले, नेहा अशोक अडुरे, शुभांगी बालाजी सोनटक्के, मृत्युंजय अरुण ऐडमाले, रिया दिलीप गजघाटे, संस्कृती सतीश पराशर व संयुक्ता संजय गिड्डे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आर. व्ही. केतकर, मानद सचिव सपना आवाडे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्लेसमेंटसाठी प्रा. एस. बी. अकिवाटे यांनी परिश्रम घेतले.

(फोटो ओळी)

०५०१२०२१-आयसीएच-०२

दक्षिण आफ्रिकेतील सीजीएम कंपनीत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड झाली.

Web Title: Placement of nine DKTE students in a company in South Africa