पिस्तूल बाळगून चोरी करणारी टोळी गजाआड

By Admin | Updated: January 17, 2015 00:42 IST2015-01-17T00:37:05+5:302015-01-17T00:42:34+5:30

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pistol gang robbery gang | पिस्तूल बाळगून चोरी करणारी टोळी गजाआड

पिस्तूल बाळगून चोरी करणारी टोळी गजाआड

कोल्हापूर : बेकायदेशीर पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या व जबरी चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज, शुक्रवारी अटक केली. राहुल संभाजी समुद्रे (वय २४, रा. किणी शाळेच्या पाठीमागे किणी, ता. हातकणंगले), रोहित राजेंद्र कार्वेकर (२३, रा. गणपती मंदिरजवळ दानोळी), गोट्या ऊर्फ प्रवीण बबन कुरणे (२४ रा. सुभाष चौक, दानोळी) अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत राऊंड, एक एअरगन पिस्तूल व मोबाईल, आयफोन, दुचाकी असा सुमारे दोन लाख ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे-बंगलोर महामार्गावर किणी रस्त्यावर पोलिसांनी दुपारी सापळा रचला. यावेळी संशयित राहुल समुद्रे हा तेथून जात असताना त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्या कब्जातील देशी बनावटीची मॅगझिन असलेली पिस्तूल, जिवंत राऊंड व नऊ एम. एम. पिस्तूलसारखी दिसणारी एअरगन अशी एक लाख २० हजार २०० रुपयांची बेकायदेशीर अग्निशस्त्रे आढळली. त्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याकडे भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३(१) २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर सांगली फाटा येथे संशयित रोहित राजेंद्र कार्वेकर व गोट्या ऊर्फ प्रवीण कुरणे यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आयफोन, मोबाईल असा सुमारे ९२ हजार रुपयांचा व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी सुजित जनार्दन पाटील हे मित्रासोबत विमानतळ परिसरात एच. पी. गोडावूनजवळ अभ्यास करत बसले असताना तसेच अमर महेश चावला हे रस्ता बाजूच्या थांबवून मोबाईलवर बोलत असताना संशयितांनी ही चोरी केल्याचे उघडकीस आले. त्याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिलकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव,उपनिरीक्षक रमेश ढाणे, हमीद शेख यांच्यासह अनिल ढवळे, लक्ष्मण धायगुडे, शिवाजी खोराटे, यशवंत उपराटे, संजय काशीद, राजू आडूळकर, रफिक आवळकर, जितेंद्र भोसले, विजय कोळी, सुनील इंगवले, रमेश डोईफोडे, प्रकाश संकपाळ, संग्राम पाटील, अमित सर्जे, अमर आडसुळे, संजय हुंबे, विशाल काळेकर आदींनी केली.

Web Title: Pistol gang robbery gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.